Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कल्याणमध्ये डॉक्टर अनाथाश्रमाच्या नावाखाली मुलांची खरेदी-विक्री करत होता?

 कल्याणमध्ये डॉक्टर अनाथाश्रमाच्या नावाखाली मुलांची खरेदी-विक्री करत होता?


दुसरीकडे डॉ. सोनींवर 5 दिवसांच्या मुलाची अवैधरित्या खरेदी केल्याचाही आरोप आहे. दरम्यान, महिला-बालकल्याण विभागाने डॉ. सोनींच्या अनाथालयात गुप्तपणे डांबून ठेवलेल्या 71 अल्पवयीन मुला-मुलींची सुटका केली आहे. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ म्हणाले, "डॉक्टर मुलांची खरेदी-विक्री करत होता का? या दिशेनेही तपास करण्यात येतोय."डॉ. सोनी अटकेत असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.त्यांच्या नंदादीप फाउंडेशनचे सर्व संपर्क क्रमांक बंद येत आहेत.

मूल खरेदीचं प्रकरण काय आहे?

मूल खरेदी केल्याप्रकरणी डॉ. केतन सोनी यांच्याविरोधात 24 नोव्हेंबरला डोंबिवलीत गुन्हा दाखल झाला. पण, मुलाच्या खरेदी-विक्रीचं हे प्रकरण उघडकीस आलं होतं 23 नोव्हेंबरला. बाल संरक्षण अधिकाऱ्यांना सामाजिक कार्यकर्त्यांकडून एका महिलेने 5 दिवसांचं मूल डॉक्टरला विकल्याची माहिती मिळाली होती. बाल संरक्षण अधिकारी पल्लवी जाधव सांगतात, "आम्ही तात्काळ महिलेची भेट घेतली. पोलिसात तक्रार दाखल केली. त्यामुळे बाळाचा वेळीच ताबा मिळवण्यात यश आलं."


आता ते बाळ बालकल्याण समितीच्या ताब्यात आहे.

मुलांची खरेदी-विक्री बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमानुसार गुन्हा आहे. डोंबिवलीचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चव्हाण यांनी महिला बालकल्याण विभागाला या प्रकरणाची माहिती दिली होती. ते म्हणाले, "ही महिला माझ्याकडे आली तेव्हा खूप घाबललेली होती. तिचं समुपदेशन करण्यात आलं आणि त्यानंतर महिला बालकल्याण विभागासोबत गुन्हा दाखल करण्यात आला. मूल खरेदी-विक्री प्रकरणी डॉ. सोनी यांच्यासोबत मुलाची आई आणि वडीलांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. तपास अधिकारी शिंगटे सांगतात, "आम्ही डॉक्टरला नोटीस देऊन सोडलं. आई-वडील आणि डॉक्टरने संगनमताने हे केलंय. त्यामुळे पुढील काही दिवसात आरोपपत्र दाखल करणार आहोत."

'डॉक्टर म्हणाले गर्भपात करू नका, मूल दुसऱ्यांना देऊ'

अटकेच्या भीतीपोटी ही महिला प्रचंड घाबरलेली, तर समाज काय म्हणेल या चिंतेने धास्तावलेली आहे. मी टीबीचा उपचार घेत होते. घरची परिस्थिती हलाखीची. त्यामुळे मुलाला नंदादीप अनाथालयात ठेवलं, तिने सांगण्यास सुरूवात केली. माझं नाव वर्तमानपत्रात आलंय. तुम्ही छापू नका अशी विनंतीही तिने केली. त्या पुढे म्हणाल्या "मला मूल नको होतं. त्यामुळे मुलाला भेटण्यासाठी अनाथालयात गेले असता मी डॉक्टरांना गर्भपाताबाबत सल्ला विचारला." या महिलेच्या प्रत्येक शब्दातून अटकेची भीती स्पष्ट दिसून येत होती.


"गर्भपात करून तुम्हाला काहीच फायदा नाही. त्यापेक्षा मूल जन्माला घाला. ज्यांना मूल होत नाही त्यांना आपण देऊ. याबदल्यात तुम्हाला मोबदला देऊ," असं डॉक्टरांनी सांगितल्याचं त्या पुढे म्हणाल्या.

दोन-तीन वर्षाच्या लहान मुलीला चादरीवर झोपवून त्यांनी पुढे बोलण्यास सुरूवात केली. त्या पुढे सांगतात, "आमची मूल देण्याची इच्छा नव्हती. टीबीचा इलाज सुरू होता. परिस्थिती वाईट होती. त्यामुळे पैशाची लालूच दाखवून, परिस्थितीचा फायदा उचलून मूल देण्यास भाग पाडलं." ही महिला 10 नोव्हेंबरला रुग्णालयात प्रसूत झाली. बाल संरक्षण अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 15 नोव्हेंबरला मूल डॉक्टरांना 1 लाख रूपयांना विकण्यात आलं होतं. दोन दिवसांनी या महिलेने डॉक्टरांकडे मूल परत द्या अशी मागणी केली. त्या पुढे म्हणाल्या, "डॉक्टरांना फोन केले. पण त्यांनी मूल मिळणार नाही. आता तो विषय संपलाय असं सांगितलं."



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.