Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

यशस्वीपणे अंमलात येणारा घनकचरा प्रकल्प व्हावा कृती समितीची स्थापणा: पालकमंत्री, नगरविकास मंत्र्यांना निवेदन देणार

यशस्वीपणे अंमलात येणारा घनकचरा प्रकल्प व्हावा  कृती समितीची स्थापणा: पालकमंत्री, नगरविकास मंत्र्यांना निवेदन देणार 

सांगली, ता.१९: यशस्वीपणे अंमलात येणारा घनकचरा प्रकल्प व्हावा. त्यासाठीची निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी यासाठी आज नागरिक जागृती मंचच्यावतीने या विषयावर कृती समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्यावतीने याआधी राबवलेली निविदा प्रक्रिया रद्द व्हावी यासाठीचा स्थायी समितीचा ठराव विखंडित करण्यासाठी आयुक्तांनी पाठवलेला प्रस्ताव नगरविकास मंत्रालयाने फेटाळावा यावा पालकमंत्री जयंत पाटील आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यचाही यावेळी निर्णय झाला. 

हरित न्यायालयाच्या आदेशनांतर सुमारे साठ कोटी रुपयांचा या निधी प्रकल्पासाठी राखीव आहे. हा निधी खर्ची टाकण्यासाठी सध्या सत्ताधाऱ्यांना मोठी घाई झाली आहे. यात सर्वपक्षीय कारभारी नगरसेवक गुंतले आहेत. प्रशासनही यात सामील आहे. हा प्रकल्प यशस्वीपणे व्हावा आणि जनतेचा पैसा वाया जाऊ नये यासाठी तज्ज्ञांच्या सहभागाने कृती समिती स्थापण करण्यात आली. येथील कष्टकऱ्यांची दौलत सभागृहात झालेल्या बैठकीस माजी आमदार नितिन शिंदे, सतीश साखळकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वि.द.बर्वे, प्रा.आर.बी.शिंदे, राहुल पाटील,प्रशांत भोसले, उद्योजक माधव कुलकर्णी, श्रेयस जोशी, तोहिद शेख, डॉ.संजय पाटील, रवींद्र वळवडे आदी उपस्थित होते. 


निविदा प्रक्रियेविषयी श्री कुलकर्णी म्हणाले,‘‘ स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्र आणि देशभरातील राज्य सरकारांनी याबाबत स्पष्ट असे धोरण घेतले आहे. आपल्या महापालिकेला त्या धोरणात फक्त आपल्या शहराचा गोळा होणारा कचरा किती हेच सांगायचे आहे. ठेकेदाराने आपली टीफीन फी किती आणि लागणारी जागा किती आणि किती वर्षे तो संकलन करणार एवढेच सांगायचे आहे. त्यासाठीची सर्व ठेकेदारानेच गुंतवणूक त्यानेच करायची आहे. टीफीन फी देखील तो कचरा प्रक्रिया करून किती खत बनवणार यावर ठरवावी अशी अट आहे. त्यामुळे महापलिकेच्यावतीने सध्या राबवण्यात येत असलेली प्रक्रिया नियमबाह्य आहे. याप्रश्‍नी व्यापक लोकजागृती करावी लागेल. सत्ताधाऱ्यांवर दबाव निर्माण करावा लागेल.’’ 

श्रेयस जोशी म्हणाले,‘‘ सध्या साचलेल्या कचऱ्याची पुर्ण विल्हेवाट लावणे आणि नव्याने तयार होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्या एकत्रित निविदा काढणे पुर्णतः चुकीचे आहे. आधीच्या निविदा प्रक्रियेत अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे ती रद्दच केली पाहिजे. पुणे महापालिकेने राबवलेला प्रकल्प विचारात घेऊन त्या धर्तीवर प्रस्ताव दिला पाहिजे. ’’ 

माजी आमदार शिंदे म्हणाले,‘‘ महापालिकेच्यावतीने यापुर्वी राबवेल्या अनेक योजनांचा बोजवारा उडाला आहे. ते कचरा प्रक्रिया प्रकल्पाबाबत होऊ नये यासाठी आधीपासूनच नागरिकांनी जागरुक राहिले पाहिजे. आज त्याची ही सुरवात आहे. या प्रश्‍नी नगरविकास मंत्री शिंदे यांना भेटून निवेदन दिले जाईल.’’ 

बैठकीत निर्णय 

* ठराव विखंडनाचा प्रस्ताव फेटाळण्यासाठी निवेदन देणार 

* नव्या निविदांसाठी आयुक्तांसह लोकप्रतिनिधींना निवेदन 

* सजग नागरिक व संस्थांसाठी कार्यशाळा घेणार 

* योग्य प्रकल्पासाठी समाजात जागृतीची मोहिम राबवणार 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.