Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

४ वर्षापासुन चोरीच्या गुन्हयात पाहिजे असले आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी केले जेरबंद

४ वर्षापासुन चोरीच्या गुन्हयात पाहिजे असले आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी केले जेरबंद


मा. पोलीस अधीक्षक श्री दिक्षीत गेडाम अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले मॅडम सोो, यांनी सांगली जिल्हयातील फरारी व पाहीजे आरोपीचा शोध मोहिम राबवणेबाबत सुचना दिल्या, त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी जिल्हयातील फरारी व पाहीजे आरोपीचा शोध कामी एक खास पथक तयार केले,

त्याप्रमाणे दिनांक १८.११.२०२१ रोजी सहा पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, सुभाष सुर्यवंशी, जितेद्र जाधव, संदीप नलवडे, संदीप गुरव, साहिल कार्तीयानी ( दिपक गायकवाड कठेमहकाळ पोलीस ठाणे ) असे खाजगी वाहनाने सांगली विभागात हदीत पेट्रोलिंग करीत फरारी व पाहीजे आरोपीचा शोध घेत असताना पोना / संदीप नलवडे यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, १) कवठेमहकांळ पोलीस ठाणे भाग ३०० / २०१७ भादवि स कलम ३७९,३४ मधील पाहिजे असलेला आरोपी नामे भारत साधु कारंडे वय-३८ रा कारंदवाडी ता मिरज जि सांगली २) कवठेमहकांळ पोलीस ठाणे भाग ३०७/२०१७ भादविस कलम ३७९,३४ मधील आरोपी काशिनाथ ज्ञानु मरगळे वय ४४ रा वसंतनगर सांगली हे दोघे आपआपले घरी असल्याबाबत माहिती मिळाली मिळाली. मिळाले माहिती प्रमाणे वरील पथकाने त्या दोघांना वरील ठिकाणी हुन ताबेत घेऊन पुढील तपासकामी १) कवठेमहकांळ पोलीस ठाणे येथे भाग ३००/२०१७ भा द विस कलम ३७९.३४ व २) कवठेमहकांळ पोलीस ठाणे भाग ३०७/२०१७ भादविस कलम ३७९.३४ या दोन वेगवेगळ्या गुन्हयाचे तपासकामी रिपोर्टने त्या दोघानां वर्ग करण्यात आले. सदरचे आरोपी दोघे ही चोरीच्या गुन्हयात गेले ४ वर्षापासून परांगदा होते,

 सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, सुभाष सुर्यवंशी, जितेंद्र जाधव, संदीप नलवडे, संदीप गुरव, साहिल कार्तीयानी ( दिपक गायकवाड कठेमहकाळ पोलीस ठाणे ) यांनी पार पाडली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.