राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याची मुदत १९ नोव्हेंबर पर्यंत - जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे
सांगली, दि. 16, : सन 2019-2020 या वर्षाचे केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय युवा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. त्याकरिता नामांकनाचे प्रस्ताव https://innovate.mygov.in/national-youth-award-2020/ या पोर्टलवर 19 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन स्वीकारण्यात येतील, असे युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, केंद्र शासन यांनी कळविले आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी दिली.
ज्यांना नामांकनासाठी अर्ज / प्रस्ताव सादर करावयाचे आहे त्यांनी प्रथम नामांकनासाठी अर्ज / प्रस्ताव ऑनलाईन भरावयाचा आहे. त्यानंतर सदर प्रस्तावाच्या दोन सारख्या प्रती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली, साई फिटनेस सेंटर, नविन इमारत, मालु हायस्कूल समोर, गुलमोहर कॉलनी, दक्षिण शिवजी नगर सांगली येथे सीलबंद लिफाफ्यात विहीत मुदतीत सादर कराव्यात, असे आवाहन श्री. वाघमारे यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.