Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारताची चिंता वाढली; दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन जण कोरोना पॉझिटिव्ह

 भारताची चिंता वाढली; दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन जण कोरोना पॉझिटिव्ह


नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत 'ओमिक्रॉन' हा अतिशय जलद गतीने संक्रमित होणारा नवीन कोरोना विषाणू सापडल्याने जगाची चिंता वाढली आहे. हा विषाणू भारतात येवू नये म्हणून सकाळपासूनच केंद्रीय स्तरावर चर्चा सुरू झाल्या होत्या.

त्यातच शनिवारी उशिरा बंगळूरू विमानतळावर दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या त्यांना कॉरंटाईन करण्यात आले आहे. पण यामुळे भारताची चिंता वाढली आहे.

बंगळूरूचे आयुक्त के. श्रीनिवास यांनी दिलेल्या माहिती नुसार, बंगळूरुच्या केम्पेगौडा विमानतळावर शनिवारी (27 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेतून विमान आले. विमानात 594 प्रवासी होते त्यापैकी 94 प्रवासी हे दक्षिण आफ्रिकेतून आलेले प्रवासी आहेत. सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून या सर्व रुग्णांना 'आयसोलेशन'मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांच्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन आहे की नाही? याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. त्याबद्दल अहवाल आल्यानंतरच माहिती मिळेल. पण या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.