शेतकऱ्याची मुलगी होणार गुलाबराव पाटील यांची सून, मंदिरात पार पडणार लग्नसोहळा
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पाठोपाठ राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या घरीही सनई चौघाड्यांचे सूर घुमू लागले आहेत.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या द्वितीय क्रमांकाच्या मुलाचा विक्रांतचा आज सोमवारी जळगाव जिल्ह्यात पाळधी या गावी विवाह पार पडत आहे. मंत्राच्या घरचा विवाह असल्याने केवळ जिल्ह्याचाच नव्हे तर संपूर्ण राज्याच लक्ष या विवाह सोहळ्याकडे लागून राहिले आहे. मंत्री म्हटलं की शाही विवाह होणार असेच प्रत्येकाला वाटल्या शिवाय राहणार नाही. मात्र गाव खेड्यापासून शेतकरी ते पानटपरी चालक राहिलेल्या गुलाबराव पाटील यांनी आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्यात कोणताही बडेजाव न राखता साधे पणाने हा विवाह करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे पाटलांच्या घरी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी सून म्हणून येणार आहे.
एवढंच नव्हे तर आपल्या घरी येणारी सून ही मोठ्या राजकिय नेत्याची किंवा उद्योग पती परिवारातील न निवडता सर्व सामान्य शेतकरी परिवारातील शोधली आहे. गुलाबराव पाटील यांना राजकीय जीवनात ज्या गावाने आणि माणसांनी साथ दिली अशा चोपडा तालुक्यातील सन्फुले गावामधील भगवान भिका पाटील या शेतकऱ्याची बी इ कॉम्पुटर शिकलेली मुलगी प्रेरणा गुलाबराव पाटील यांची सून होत आहे. मुलगा विक्रांत हा मेकॅनिकल इंजिनियर असून पाळधी गावातच त्याचे वर्क शॉप आहे, मंत्री गुलाबराव राजकारणात सक्रिय असले तरी त्यांच्या सून बाई कडील परिवार मात्र राजकारणात सक्रिय नाही. गुलाबराव पाटील यांची सून उच्च शिक्षित असली तरी एका सर्व सामान्य शेतकरी परिवार मधील असल्याने, गुलाबराव पाटील यांनी गाव खेड्यातील आपली नाळ या निमित्ताने जोडून ठेवली असल्याचं पाहायला मिळत आहे.
सोमवारी होणाऱ्या विवाहसोहळ्यापूर्वी रविवारी रात्री हळदीचा कार्यक्रम पार पडला तोही अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. आज होणारा विवाह देखील पाळधी गावातील साई मंदिर परिसरात साधे पणाने करण्याचं नियोजन पाटील कुटुंबाने आखलं आहे. कोरोनाचा धोका पाहता, वाराडी नी मास्क लावण्याबाबत काळजी घेण्याचा प्रयत्नं केला जात असल्याचं पाहायला मिळाले आहे. विवाह समारंभ साधेपणाने साजरा होत असला तरी त्यातील उत्साह मात्र कायम असल्याचं पाहायला मिळतेय. पारंपरिक पद्धतीने विवाह समारंभात करण्यात येत असलेले रीती रीवाज आणि खास खान्देशी असलेला वरन-बट्टी आणि घोटलेली वांग्याची भाजीचा मेनू विवाहाचे आकर्षण राहणार आहे.या विवाहात राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे,छगन भुजबळ,दादा भुसे ,नवाब मलिक यांची उपस्थिती ही या विवाह समारंभाचे आकर्षण राहणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.