राज्यात पुन्हा निर्बंध, नवी नियमावली जाहीर, पाहा काय आहेत बंधनं?
मुंबई : देशासह राज्यात कोरोनानंतर आता कुठे सर्व काही पूर्वपदावर येत होतं. सर्व काही नियमित झालं होतं. तेवढ्यात जुन्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे सर्वांच्याच चिंतेत वाढ झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही सावध भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने खबरदारी म्हणून पुन्हा काही निर्बंध लावले आहेत. सरकारने या संदर्भात नवी नियमावली जाहीर केली आहे.
काय आहे नियमावलीत?
आरोग्य विभागाच्या नियमावलीनुसार आता लसवंतानाच म्हणजे दोन्ही डोस पूर्ण झालेल्यानाच रेल्वे प्रमाणेच बससेवा, रिक्षाने प्रवास करण्याची मुभा असणार आहे. नियमांचं भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. रिक्षा आणि टॅक्सीत विनामास्क आढळल्यास प्रवाशासह ड्रायव्हरलाही 500 रुपये दंड द्यावा लागेल. तसेच दुकानात ग्राहक विनामास्क सापडल्यास 500 रुपये दंड द्यावा लागेल. तर त्या दुकान मालकाला 10 हजार दंड द्यावा लागेल. तर मॉलमध्ये ग्राहकाने मास्क न घातल्यास त्याचा भुर्दंड हा मालकाला सोसावा लागणार आहे. मालकाला थेट 50 हजार रुपये द्यावे लागतील. राजकीय सभा आणि कार्यक्रमांचं काय?
आरोग्य विभागाने या नियमावलीतून राजकीय पक्षांनाही सवलत दिलेली नाही. या राजकीय कार्यक्रमांनाही निर्बंध लादले आहेत. कार्यक्रम आणि सभांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्यास आयोजकांवर 50 हजार रुपये दंड आकारला जाईल. इतकच नाही, तर कार्यक्रम सुरु ठेवायचा की तिथेच बंद करायचे आदेश द्यायचे याचे अधिकार हे स्थानिक प्रशासनाला असणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.