अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान सुरू, अमित शहांकडे तक्रार करणार : नवाब मलिक
मुंबई, 27 : राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी एक ट्विट करत आपल्या घरावर कुणीतरी पाळत ठेवत असल्याचा दावा केला. त्यानंतर आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याला सुद्धा अनिल देशमुख यांच्या प्रमाणे अडकवण्याचं कटकारस्थान सुरू असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
नवाब मलिक म्हणाले, ज्या प्रमाणे मी दोन महिन्यांपासून चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली त्यानंतर मला माहिती मिळण्यास सुरुवात झाली की, तुमचे कार्यालय, घर, नातवंड कुठे शिक्षण घेतात याची माहिती घेत आहेत. जेव्हा मी परदेशच्या दौऱ्यावर होतो तेव्हा काहींनी दोघांना पकडले, जे नागरिक फोटोज क्लिक करत होते. जेव्हा या दोघांना पकडलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही घाबरलो होतो म्हणून पळालो. नवाब मलिक पुढे म्हणाले, गेले 2 महिने मला काही लोकं माहिती देत होते की काही पक्षाचे कार्यकर्ते माझ्या घराची आणि ऑफिसची माहिती घेत आहेत.
माझ्या नातवांची देखील माहिती घेण्यात येत आहेत. ते कुठं शाळेत जातात यावर देखील त्यांचं लक्ष आहे. मी दुबईला असताना दोन जण माझ्या घरचे फोटो काढत आहेत. हे करत असताना स्थानिक नागरिकांनी त्यांना पकडलं आहे.
अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचा प्रयत्न नवाब मलिक पुढे म्हणाले, कारमध्ये बसलेला व्यक्ती, गाडीचा नंबर सुद्धा समोर आला आहे. आम्ही या संदर्भातील तक्रार मुंबई पोलिसांत करणार आहोत आणि चौकशी करण्याची मागणी करणार आहे. या षडयंत्रामागे कोण आहे याची माहिती समोर यायला हवी. अनेक षडयंत्र माझ्याविरोधात झाले आहेत.
या संदर्भातील अनेक पुरावे माझ्याकडे आहेत आणि त्याबाबतही मी पोलिसांना माहिती देईल. मला वाटतं की, अनिल देशमुख यांना ज्या प्रमाणे अडकवलं जात आहे त्याचप्रमाणे आता काही जण माझ्याविरोधात षडयंत्र करत आहेत. या संदर्भातील मला माहिती मिळाली असून पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत. माझ्याविरोधात खोटी तक्रार केली जात आहे.
या संदर्भातील माहितीही मुंबई पोलिसांना देणार आहोत असंही नवाब मलिक म्हणाले. वाचा : या व्यक्तींना तुम्ही ओळखता का? घराच्या रेकी करण्याचे फोटो मलिकांनी केले ट्वीट, म्हणाले... माझ्याविरोधात षडयंत्र मी घाबरतो किंवा मला सुरक्षा हवी आहे असं नाहीये. मी कुणालाही घाबरणार नाहीये.
कुणालाही रेकॉर्डसाठी फोटो हवे असतील तर ते गुगलवर उपलब्ध आहेत. पण रेकी केली जात आहे. अनिल देशमुखांच्या विरोधात ज्याप्रमाणे खोटी तक्रार करुन त्यांच्या विरोधात कारवाई सुरू झाली. त्याचप्रमाणे केंद्रीय यंत्रणेचे अधिकारी माझ्याविरोधात मसूदा तयार करुन नागरिकांना पाठवत आहेत.
तसेच माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करायला सांगत आहेत असाही खळबळजनक आरोप नवाब मलिकांनी केला आहे. वाचा : अमित शहा-फडणवीसांच्या बैठकीला शरद पवार हजर? राष्ट्रवादीने केला 'त्या' फोटोचा पर्दाफाश अमित शहांकडे तक्रार करणार नवाब मलिक म्हणाले, राज्यात एखाद्या मंत्र्याला अडकवण्याचा डाव जर केंद्रीय यंत्रणा करत असेल तर आम्ही सहन करणार नाही. माझ्याकडे खरे पुरावे आहेत.
केंद्रीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअप चॅट मला मिळाले असून त्या संदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रार करणार आहे. मी अमित शहा यांच्याकडेही तक्रार करणार आहे. कटकारस्थानाला मी घाबरत नाही या कटकारास्थानाला मी घाबरत नाही. या संदर्भातील मी मुंबई पोलीस आयुक्त आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहणार आहे. राज्यातील एका मंत्र्याला खोट्या तक्रारी करुन अडकवण्याचा जर डाव असेल... एक अनिल देशमुख झाले इतरही लोक अनिल देशमुख होतील हा यांचा गैरसमज आहे. कारवाई केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असंही नवाब मलिक म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.