Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिक्षण संस्थांच्या प्रश्नावर खा. शरद पवार लक्ष घालणार.. -रावसाहेब पाटील, खजिनदार

 शिक्षण संस्थांच्या प्रश्नावर खा. शरद पवार लक्ष घालणार.. -रावसाहेब पाटील, खजिनदार



सांगली दि. १८: महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अधिवेशन नाशिक येथे दि. १५ व १६ नोव्हेंबर रोजी महामंडळाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या अधिवेशनाचे उद्घाटन खा. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी खा. पवार यांनी शिक्षण संस्थांचे प्रश्न हे महत्वाचे असून ते सुटण्यासाठी ते व ना. छगन भुजबळ जातीने लक्ष घालून शिक्षण मंत्री व अर्थमंत्र्याबरोबर चर्चा करणार असल्याचे महामंडळ खजिनदार रावसाहेब पाटील यांनी सांगितले. खा. पवार व ना. भुजबळ यांनी स्व.वसंतदादा पाटील यांनी शिक्षण क्षेत्राच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतले होते व शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी महामंडळ स्थापन केले आणि महामंडळ कायम संस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी खूप चांगले काम करत आहे असे गौरवोद्गार काढल्याचे रावसाहेब म्हणाले.

या अधिवेशनात - आरटीई कायद्यांतर्गत आर्थिक मदतीमध्ये खासगी शिक्षण संस्थाचा समावेश करणे, शिक्षणावरील खर्चात भरघोस वाढ करणे, शिपाई पदे मानधनावर भरणेचा निर्णय रद्द करणे, महाराष्ट्र शिक्षण कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी समिती नेमणे, शिक्षक व शिक्षकेतर भरतीचे अधिकार संस्थांना पूर्वीप्रमाणे देणे, महामंडळाला विश्वासात घेऊन नियमित बैठकांचे आयोजन करणे, संस्थांच्या कामात शिक्षण खात्याचा अवाजवी हस्तक्षेप कमी करणे, जुन्या इमारतीच्या जागी शाळांच्या नवीन इमारती बांधण्यासाठी निधी देणे, यूजीसी कायदा दुरुस्ती, प्राध्यापक भरती तातडीने करणेस मान्यता, शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा त्वरित भरणे, शाळांना १००%अनुदान मंजूर करणे व तुकडीवर आधारित संचमान्यता करणे इ. व अन्य अनेक शैक्षणिक प्रश्नावर अधिवेशनात सखोल चर्चा खा. पवार यांच्या समोर झाली. हे सर्व प्रश्न त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक ऐकून घेतले व शासनाबरोबर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेण्याचे मान्य केल्याची माहिती रावसाहेब पाटील यांनी दिली.

यावेळी आ. किरण सरनाईक, I माजी आमदार विजय गव्हाणे, उपाध्यक्ष अशोक थोरात, कोंडाजीमामा आव्हाड, सरचिटणीस एस. पी. जवळकर व रविंद्र फडणीस, समन्वयक अनिकेत पाटील, आबेदा इनामदार, मिलिंद पाटील, वसंत घुईखेडकर, सुशीला मोराळे, वाल्मिकी सुरासे, विनोद पाटील, विनोद पाटोळे व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्य़ातील शिक्षण संस्था चालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी विजय नवल पाटील यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यात त्यांचा सत्कार करुन अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांचा प्रारंभ होऊन वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे रावसाहेब पाटील यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.