Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संपूर्ण जगाची धाकधूक वाढवणाऱ्या 'ओमिक्रॉन'ची 'ही' आहेत लक्षणे; तरुणांना सर्वाधिक धोका

 संपूर्ण जगाची धाकधूक वाढवणाऱ्या 'ओमिक्रॉन'ची 'ही' आहेत लक्षणे; तरुणांना सर्वाधिक धोका


नवी दिल्ली : करोनाच्या नव्या व्हेरियंटने जगाच्या चिंतेत पुन्हा वाढ केली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर जगभरातील सर्वच देशांनी उपययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

ओमिक्रॉन व्हेरियंटची पुष्टी झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनंही चिंता व्यक्त केली आहे. त्यातच संपूर्ण जगाला धडकी भरवणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लक्षणे आता समोर आली आहेत.

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रीय संचारी रोग संस्थान (एनआयसीडी) च्या वतीने या ओमिक्रॉन व्हेरियंटविषयी माहिती देण्यात आली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण एखाद्या व्यक्तीला झाली तर त्या व्यक्तीमध्ये फारशी काही वेगळी लक्षण दिसून येत नाहीत.

एनआयसीडीने दिलेल्या माहितीनुसार, असेही सांगितले जात आहे की, डेल्टाप्रमाणेच ओमिक्रॉननं बाधित झालेल्या व्यक्ती एसिम्टोमेटिक होत्या. अशातच एनआयसीडीनं असं मानलं जातंय की, ओमिक्रॉननं बाधित व्यक्तीमध्ये फारशी वेगळी लक्षण दिसत नाहीत.

या व्हेरिएंटमुळे सौम्य आजार होण्याची शक्यता असल्याचं दक्षिण आफ्रिकेतील मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष एंजेलीक कोएट्जी यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की, 'या आजाराचे सौम्य लक्षणं दिसत आहे. यामध्ये स्नायू दुखणे, थकवा जाणवणे, अथवा दोन दिवस आजारी राहण्यासारखी लक्षणं दिसत आहेत.

आतापर्यंत या व्हेरिएंटमुळे वास न येणं यासारखी समस्या कुणामध्येही जाणवली नाही. संक्रमित व्यक्तींमध्ये थोड्याफार प्रमाणात कफ होण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉनने संक्रमित झालेले रुग्ण घरातच उपचार घेत आहेत.

ओमिक्रॉनच्या तपासणीबाबत सांगताना WHO ने , सध्या SARS-CoV-2 PCR हा व्हेरियंट पकडण्यात सक्षम आहे. नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर भारतासोबत इतर अनेक देशही सतर्क झाले आहेत. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेहून येणाऱ्या प्रवाशांना क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी चाचणी करणं बंधनकारक असल्याचे सांगण्यात येत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.