Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली आगारातील संपकरी कर्मचाऱ्याच्या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधून आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी पाठिंबा दिला

सांगली आगारातील संपकरी कर्मचाऱ्याच्या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधून आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी पाठिंबा दिला   


सांगली ता. ११ नोव्हेंबर :- सांगली आगारातील एस.टी. च्या कर्मचार्यां ची शासनात विलीनीकरणाची  मागणी अत्यंत योग्य आहे. जनतेच्या सेवेमध्ये आपल्या कुटुंबियांच्या पासून दूर राहून जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्याला अत्यंत अल्प पगारात काम करावे लागते. एस.टी. महामंडळाचे शासना मध्ये कोणत्याही परिस्थितीत विलिनीकरण केलीच पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी यावर ताबडतोब निर्णय घ्यावा. 


अन्यथा ही मागणी आम्ही विधानसभेच्या येत्या अधिवेशनात ठामपणे मंजूर करून घेऊ असे कर्मचाऱ्यांना आश्वासन आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी दिले.तसेच भाजपा कामगार आघाडीचे उपाध्यक्ष श्री अविनाश मोहिते म्हणाले, या संपाचं आता संपूर्ण नेतृत्व कामगारांच्या हातात आहे. कामगार आपल्या मागण्याशी ठाम आहे. कोणत्या ही परिस्थितीत एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनामध्ये विलीनीकरण केल्या शिवाय कामगार आता संपातून माघार घेणार नाही. तसेच आज  सांगली आगारातील कर्मचारी कै. राजेंद्र निवृत्ती पाटील यांचे हृदयविकाराने निधन झाले त्यांूना सर्वांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी माजी उपमहापौर नगरसेवक युवराज बावडेकर, समाजकल्याण सभापती नगरसेवक सुब्राव तात्या मद्रासी, नगरसेविका सौ उर्मिला बेलवलकर, ज्येष्ठ नेते श्रीकांत तात्या शिंदे, दीपक कर्वे, अजयकुमार वाले, उदय बेलवलकर, आदी भाजपा पदाधिकारी यांच्यासह एसटी कर्मचारी बंधू आणि भगिनी उपस्थित होते....


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.