Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जगातील महाग बाईक, किंमत ८१ कोटी ७५ लाख

 जगातील महाग बाईक, किंमत ८१ कोटी ७५ लाख


निमन मार्क्स लिमिटेड एडिशन फायटर ही मोटारसायकल जगातील सर्वात महाग बाईक ठरली आहे. सर्वसामान्य ग्राहक तिच्या खरेदीचा विचार सुद्धा करू शकणार नाही मात्र स्वप्नवेडे हि बाईक खरेदीची स्वप्ने नक्की पाहू शकतात.

या बाईकची लिलावात ११०.००० डॉलर्स बेसिक प्राईज ठरविली गेली होती मात्र प्रत्यक्षात तिला १०० पट अधिक किंमत मिळाली. ही बाईक ११ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ८१ कोटी ७५ लाख रुपयांना विकली गेली. या बाईकची ४५ युनिट तयार करण्यात आली असल्याने ती लिमिटेड एडिशन बाईक आहे.

सगळ्यात विशेष म्हणजे निमन मार्क्स हि ऑटो क्षेत्रातील कंपनी नाही तर निमन मार्क्स लग्झरी डिपार्टमेंट स्टोअर ब्रांड आहे. पण कंपनीने जेव्हा हि लिमिटेड एडिशन फायटर बाईक लिलावासाठी लाँच केली तेव्हा तिची किंमत प्रचंड वाढली आणि बघता बघता ती जगातील सर्वात महाग बाईक बनली.

लिमिटेड एडिशन फायटर बाईक काही मिनिटात, तिचा सर्वाधिक वेग ताशी ३०० किमी घेऊ शकते. तिची बॉडी टायटेनियम, अल्युमिनियम आणि कार्बन फायबरची बनवली असून हि बाईक अतिशय आकर्षक स्वरुपात पेश केली गेली आहे. तिला इव्होल्युशन ऑफ द मशीन अशी ओळख मिळाली आहे. या बाईकला १२० सीआय ४५ डिग्री एअरकुल्ड व्ही ट्वीन इंजिन दिले गेले आहे. या एका बाईकच्या किमतीत ८१ बीएमडब्ल्यू कार्स खरेदी करता येऊ शकतात.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.