Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

श्री सिध्दिविनायक बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेतफै महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

श्री सिध्दिविनायक बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेतफै महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट



सांगली: सालाबाद प्रामणे श्री सिध्दिविनायक बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याची परंपरा अखंडीत ठेवून यावर्षीची या कर्मचाऱ्यांसमवेत दिवाळी सण साजरा केला. संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांची कोणत्याही गैरसोय होऊ न देता दिवाळी सन मोठ्या आनंदाने साज करता यावा यासाठी स्वताच्या व कुटुंबाच्या आनंदाचा विचार न करता सणाच्या दिवस रात्र स्वच्छतेची कामगिरी पारपाडणाऱ्या स्वच्छता कर्मचा-याविषयीची सामाजिक बांधीलकी ओळखून प्रतीवर्षी श्री सिध्दिविनायक बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अमर निंबाळकर व संस्थेच्या सचिव तथा नगरसेविका वर्षा अमर निंबाळकर यांचेकडून हा उपक्रम राबविला जातो. यावर्षीही मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांसह विद्युत विभाग, आशा वर्कर, अंगणवाड़ी सेविका व मदतनिस, ड्रेनेज विभाग, पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना काँग्रेस पक्षाच्या नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील यांचे हस्ते व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त श्री राहुल रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवाळी भेटीचे वाटप करणेत आले. यावेळी भागातील नागरिकांकडून नगरवेविका सौ. वर्षा अमर निंबाळकर व  अमर निबाळकर यांच्या या उपक्रमाबद्दल कौतूक करणेत आले.

यावेळी 'मी वडार महाराष्ट्राचा', संघटनेचे महानगरपालिका क्षेत्राध्यक्ष व श्री सिध्दिविनायक बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अमर निंबाळकर व संस्थेच्या सचिव तथा वर्षा अमर निंबाळकर, वडार समाज संघटक डॉ. सतिश नाईक, माजी नगरसेवक आनंदा वडर, कॉन्ट्रॅक्टर असो.चे अध्यक्ष चंद्रकांत आबा हंचनाळे, प्रकाश चौधरी, शिवाजी धोत्रे, अनिल वडर, गणेश वडर, अमोल धोत्रे, कुमार गुंजी, बजरंग वडर, राजू नाईक, सागर पवार, संतोष कलकुटगी, कुमार कलगुटगी, महेश कलकुटगी ,भारत कलकुटगी, निलेश वडर, विजय कलकुटगी, दिनेश खुंटे, प्रमोद कलकुटगी, संदीप वडर, विकी नाईक, पृथ्विराज कलकुटगी, प्रथमेश कलकुटगी, मयुरेश गुंजी, आब्बास शेख, सौरभ कलगुटगी, मिरासाब गडेकर, वरुण खुंटे, रोहीत पवार, यांचेसह भागातील जेष्ठ नागरीक व महिला मोठ्यासंख्येने उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.