Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नागपुरातील वयोवृद्ध महिला डॉक्टरच्या हत्येचं गूढ उकललं; नातवानेच हात-पाय बांधून चिरला गळा

 नागपुरातील वयोवृद्ध महिला डॉक्टरच्या हत्येचं गूढ उकललं; नातवानेच हात-पाय बांधून चिरला गळा


नागपूर, 30 नोव्हेंबर : शनिवारी रात्री नागपूर शहराला हादरवून सोडणाऱ्या देवकाबाई बोबडे  यांच्या हत्याकांडाचा उलगडा करण्यात नागपूर पोलिसांना यश आले  आहे.

नातवानेच आजींची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मीतेश पाचभाई हा आरोपी असून तो मृतक आजींचा नातू आहे. आरोपीचे इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले असून तो मृतकच्या घरी वर आईवडिलांसोबत राहत होता.  हत्येमागचं कारण ऐकून सर्वच हैराण आरोपीने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये एका विद्यापीठात प्रवेश मिळवला होता.

त्यासाठी 1 कोटी 40 लाख रुपयांचा खर्च येणार होता. 40 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते तर उर्वरित पैशासाठी आरोपी आजीकडे तगादा लावत होता. आजी त्याला पैसे देण्यास टाळाटाळ करत होती, त्यामुळे ती खदखद आरोपीच्या मनात कायम होती. शनिवारी घटनेच्या दिवशी कपडे घालण्यावरून आजीने आरोपी नातवाला टोकलं.

त्यांनतर रागाच्या भरात आरोपीने अत्यंत क्रूरपणे देवकाबाई बोबडे यांची हत्या केली. हत्येच्यावेळी देवकाबाई यांनी स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने आजींचे हात , पाय बांधून तोंडावर पट्टी लावली आणि त्यानंतर त्यांचा धारदार शस्त्राने गळा कापून हत्या केली. तांत्रिक पुराव्याच्या आधारावर पोलिसांनी या हत्याकांडाचा उलघडा केला.

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. वाचा : हात बांधले, तोंडावर चिकटपट्टी लावून कापला गळा; नागपुरात महिला डॉक्टरची निर्घृण हत्या आरोपी मितेश पाचभाई हा मृतक आजींच्या मुलीचा मुलगा आहे मृतक आजींची मुलगी स्वतःच्याच घरी वरच्या माळ्यावर राहत होती. त्यामुळे आजी आणि नातवांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून खटके उडायचे. आजी थोडीशी स्वभावाचे कडक असल्याने ती नातवाला सतत छोट्या छोट्या कारणांनी बोलत असे.

त्यातच आरोपी आजींकडे अमेरिकेत शिक्षणाला जाण्यासाठी पैसे मागत होता. आरोपी डिसेंबरला अमेरिकी शिक्षणाला जाणार होता मात्र पैसे द्यायला टाळाटाळ करत होती. त्यामुळे आरोपीने घटनेच्या दिवशी तात्कालीन कारणाने वाद घातला आणि आजीची हत्या केली आजीची हत्या केल्यानंतर आरोपी स्वतःच्या राहत्या खोलीत गेला. आपण हत्या केलीच नाही असा बनाव करण्यासाठी त्यानंतर तो नियमित जिमला देखील गेला आणि दैनंदिन दिनचर्येला लागला.

सायंकाळी जेव्हा हत्याकांडाचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी सर्व बाजूने हत्याकांडाचा तपास केला. त्यानंतर काही तांत्रिक पुरावे पोलिसांच्या हाती लागले त्यानंतर पोलिसांनी मीतेश पाच भाई यांना अटक केली. या हत्याकांडात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का याचाही तपास पोलीस करत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.