Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मा. जैलाबाभाई शेख युवा मंच यांचे वतीने थोर स्वातंत्र्यवीर महानयोद्धा ह. टीपू सुलतान यांची २७१ वी जयंती उत्साहाने साजरी.

मा. जैलाबाभाई शेख युवा मंच यांचे वतीने थोर स्वातंत्र्यवीर महानयोद्धा ह. टीपू सुलतान यांची २७१ वी जयंती उत्साहाने साजरी.


आज दि. २० नोव्हेबर २०२१
रोजी मिरज येथील स्व.अहमद बाशा चौक, एस.टी. स्टँड परीसर मिरज येथे सालाबाद प्रमाणे मा. जैलाब शेख युवामंच यांचे वतीने महानयोद्धा, थोर स्वातंत्रसेनानी ह. टीपू सुलतान यांची 273 वी जयंती आनंदाने व उत्साहाने साजरी करणेत आली.

यावेळी प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हा सेक्रेटरी जैलाब शेख व आर.पी.आय.(आठवले) आय.टी. सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे यांचे हस्ते ह. टीपू सुलतान यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. यावेळी फटाक्यांची अतिषबाजी करून व गोड खाऊचे वाटप करून मोठ्या आनंदाने जयंती साजरी करणेत आली.

यावेळी योगेंद्र कांबळे व मा. जैलाब शेख यांनी सर्व जनतेला ह. टीपू सुलतान जयंतीच्या शुभेच्छा देऊन ह. टीपू सुलतान यांच्या इतिहासाची थोडक्यात माहीती दिली.


यावेळी मराठा समाजाचे प्रतिनीधी रामा शिंतोडे व नारायण बेळगावकर,ख्रिश्चन समाजाचे प्रतिनीधी विजय बल्लारी,आर.पी.आय. व्ही.जे.एन.टी. आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष सुनिल माने,राष्ट्रवादीचे युवक मिरज शहर अध्यक्ष शाहबाज कुरणे, गोगा बागवान ,आबीद शेख, सिराज शिकारी,परवेझ काझी, सलिम शेख, बाबाजान निशानदार यांचे सह आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.