Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिकेकडून निर्भया पथकाला नवी गाडी : महापौर आयुक्तांच्या उपस्थितीत गाडीचे पोलीस दलाला लोकार्पण

 महापालिकेकडून निर्भया पथकाला नवी गाडी : महापौर आयुक्तांच्या उपस्थितीत गाडीचे पोलीस दलाला लोकार्पण


सांगली मिरज आणि कुपवाड शहरात महिला सुरक्षेसाठी गस्त घालणाऱ्या पोलीस दलाच्या निर्भया दामिनी पथकाला महापालिकेकडून गाडी प्रदान करण्यात आली आहे. या नव्या गाडीचे लोकार्पण महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि मनपा आयुक्त नितीन कापडणीस आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याकडे या वाहनाच्या चाव्या सुपूर्त करण्यात आल्या.

   सांगली पोलीस दलाकडे महिला सुरक्षेसाठी निर्भया पथक आहे. या पथकाला महापालिका क्षेत्रात पेट्रोलिंग करण्यासाठी महापालिकेने एक वाहन दिले होते. हे वाहन जुने झाल्याने महापालिका प्रशासनाने या पथकासाठी महिला बालकल्याण समितीकडून नवे वाहन खरेदी केले आहे. 

या नव्या वाहनांचे लोकार्पण आज महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी स्थायी सभापती निरंजन आवटी, गटनेते विनायक सिंहासने, महिला बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील, उपायुक्त राहुल रोकडे, नगरसेवक सुबराव मद्रासी , कार्यशाळा प्रमुख तेजस शहा उपस्थित होते


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.