Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अवघ्या ३५ पैशांच्या शेअरने नशीब पालटले; गुंतवणूकदार झाले करोडपती!

 अवघ्या ३५ पैशांच्या शेअरने नशीब पालटले; गुंतवणूकदार झाले करोडपती!


मुंबई : शेअर बाजार हा एक प्रकारे जुगार आहे, असे म्हटले जाते. परंतु योग्य प्रकारे व्यवहार केल्यास त्यामध्ये फायदा देखील होऊ शकतो, असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास कोणाला लॉटरी लागेल किंवा एखाद्याचे नशीब बदलून जाईल हे सांगता येत नाही.

परंतु त्यासाठी त्या विषयाचा अभ्यास आणि योग्य माहिती असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. शेअर मार्केटमुळे नशीब पालटू शकते हे मात्र निश्चित.

शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या असून त्यांच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. यापैकी काहींमध्ये पेनी स्टॉकचाही समावेश आहे. असाच एक पेनी स्टॉक हा फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिकचा आहे. दोन वर्षांपूर्वी या स्टॉकची किंमत 0.35 पैसे होती, आता ती प्रति स्टॉक 143.25 रुपये झाली आहे. जवळपास दोन वर्षात त्यात 409 पट वाढ झाली आहे. एक लाख रुपयांची रक्कम पाहिली तर या शेअरने वर्षभरात करोडपती केले आहेत.

फ्लोमिक ग्लोबल स्टॉक आलेख नुसार, 28 मार्च 2019 रोजी बीएसई निर्देशांकावर शेअरची किंमत 0.35 पैसे होती. आता ती 143.25 रुपये प्रति शेअरच्या पातळीवर पोहोचली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना सुमारे 40,830 टक्के परतावा मिळाला आहे. गेल्या सहा महिन्यांत शेअरची किंमत 7.62 रुपयांवरून 143.25 रुपयांपर्यंत वाढली आहे. यात सुमारे 1,780 टक्के वाढ झाली आहे.

त्याचवेळी, 2021 मध्ये, हा स्टॉक 1.95 रुपयांच्या पातळीवरून 143.25 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या कंपनीने आपल्या भागधारकांना सुमारे 7,245 टक्के परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्सच्या शेअरची किंमत 1.22 रुपयांवरून 143.25 रुपयाच्या पातळीवर पोहोचली आहे. म्हणजे यात सुमारे 11,640 टक्के वाढ झाली आहे.

फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिकच्या शेअरची रक्कम पाहिली तर सहा महिन्यांत एक लाख रुपये 18.80 लाख रुपये झाले आहेत. जर गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर त्याची रक्कम 1.17 कोटी रुपये झाली असती. त्याचप्रमाणे गुंतवणूकदाराने 0.35 पैसे प्रति शेअर पातळीवर 1 लाख गुंतवले असते तर आज 4.09 कोटी रुपये झाले असते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.