Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्नाटकमधील एसटी फायद्यात, मग महाराष्ट्रातच कशी तोट्यात..?

 कर्नाटकमधील एसटी फायद्यात, मग महाराष्ट्रातच कशी तोट्यात..?


मुंबई: कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्याऐवजी चार विभागांत विभाजन केले आहे.

२० वर्षांपूर्वीच त्यांनी हा निर्णय घेतल्याने तेथील राज्य सरकारची परिवहन सेवा महाराष्ट्राच्या तुलनेत अतिशय चांगली आहे. राज्याच्या चार विभागांतून प्रशासकीय काम चालत असल्याने कोणत्या हंगामात कोठे उत्पन्न मिळते, तिथे बस सेवा कशी दिली पाहिजे याचे काटेकोर नियोजन केले जाते. परिणामी तेथील एस.टी. महामंडळ सक्षम कार्यरत आहे. याउलट महाराष्ट्रात याकडे दुर्लक्ष झाल्याने महामंडळ आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाले आहे.

कर्नाटकातही १९९७ पूर्वी एकच राज्य परिवहन महामंडळ होते. बंगळुरूमधून राज्यभर याचे व्यवस्थापन चालत असे. पण एसटीच्या चांगल्या सेवेसाठी सूक्ष्म नियोजन आणि प्रशासकीय कामकाज गतीने चालण्यासाठी चार विभाग करण्यात आले. वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाची स्थापना १ नोव्हेंबर १९९७ रोजी झाली. त्याचे कार्यालय हुबळीत आहे. ईशान्य कर्नाटक परिवहन महामंडळची स्थापना १ ऑक्टोबर २००४ रोजी झाली. याचे कार्यालय गुलबर्गा येथे आहे.

बृहन बंगळुरू महानगर परिवहन महामंडळाची स्थापना १५ ऑगस्ट १९९७ रोजी झाली. बंगलोर येथे मूळ कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ आहे. अशा चार विभागातर्फे संपूर्ण कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथे ३५,१३८ बसेस धावतात. याउलट महाराष्ट्रात एकच महामंडळ राहिले. विस्कळीत नियोजन आणि सरकारचे दुर्लक्ष यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ खंगत राहिले.

दृष्टिक्षेपात २ राज्यांतील बस

कर्नाटक :

बसची संख्या : ३५,१३८

कर्मचारी : १,२७,४८५

महाराष्ट्र :

बसची संख्या : १६,३००

कर्मचारी : ९३,३७०


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.