Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुमचं मतदान यादीत नाव नाही? टेन्शन घेऊ नका, आता मोबाईलमधूनच नाव नोंदवा

 तुमचं मतदान यादीत नाव नाही? टेन्शन घेऊ नका, आता मोबाईलमधूनच नाव नोंदवा


मुंबई, 23  : वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक जबाबदार नागरीक म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपला मतदानाचा अधिकार  बजावला पाहिजे. अनेकदा वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही काही तरुण मतदार यादीत  नाव नोंदनी  करु न शकल्याने मतदानाचा हक्क बजवण्यास मुकतात.

त्यांना मतदान करण्याची इच्छा असते पण त्यांनी मतदान यादीत नाव नोंदनीसाठी प्रयत्न न केल्याने त्यांना तो अधिकार बजावता येत नाही. पण आता काळजी करण्याची आवश्यकता नाही. आता मतदार  आपल्या मोबाईलवर  घरच्या घरी मतदार यादीत नाव नोंदवू शकतो. निवडणूक आयोगाने  स्वत: याबाबत माहिती दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील  आता विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

अ‍ॅपमध्ये नाव आणि पत्त्यांतही दुरुस्ती करता येणार

"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष आणि निवडणूक यंत्रणेला सुविधा व माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ट्रू-व्होटर मोबाईल ॲप विकसित करण्यात आलं आहे. या ॲपच्या माध्यमातून विविध सुविधांसह मतदारांना मतदार यादीतील आपले नाव शोधता येते. त्यात आता मतदार नोंदणीच्या सुविधेचीही भर घालण्यात आली आहे. त्यातून भारत निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी संकेतस्थळाच्या लिंकद्वारे मतदार नोंदणी होईल. या अ‍ॅपमध्ये मतदारांच्या नावांत किंवा पत्त्यांतही दुरूस्ती करता येईल", असं मदान यांनी सांगितलं.

अधिकाधिक पात्र नागरिकांनी नावे नोंदवावित, आयुक्तांचे आवाहन

"भारत निवडणूक आयोगातर्फे 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या निमित्ताने 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना मतदार म्हणून नाव नोंदविण्याची संधी आहे. या कार्यक्रमानंतर 5 जानेवारी 2022 रोजी विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्याच मतदार याद्या 2022 मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरल्या जाणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक पात्र नागरिकांनी नावे नोंदवावित किंवा नावांमध्ये अथवा पत्त्यांत बदल असल्यास तोही आता करावा", असे आवाहन मदान यांनी केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.