Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रियंका गांधींनी केली लखमीपूरमधील शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी

 प्रियंका गांधींनी केली लखमीपूरमधील शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी


नवी दिल्ली : शुक्रवारी देशाला उद्देशून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली होती. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. आता लखीमपूर खीरी येथे भाजप नेत्याच्या गाडीखाली चिरडून ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने न्याय देण्याची मागणी प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केली आहे.पत्रकार परिषद घेऊन ही मागणी प्रियंका गांधी यांनी केली. त्यांनी म्हटले की, लखीमपूर खीरीमध्ये गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याने शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडल्याचा आरोप आहे. पण, भाजप सरकार आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोपींसोबत व्यासपीठावर एकत्र दिसले, तर ते शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांना संरक्षण देत असल्याचा संदेश लोकांमध्ये लोकांमध्ये जाईल. पंतप्रधानांचा हा निर्णय 700 हून अधिक शहीद शेतकऱ्यांचा अपमान असेल, असेही प्रियंका यांनी म्हटले.

गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांविरोधात सुरू असलेले खटले सरकारने मागे घ्यावेत आणि पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही प्रियंका गांधींनी केली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.