नगरसेवक मा.लक्ष्मणभाऊ नवलाई यांना राज्यस्तरीय कुशल नेतृत्व लोकगौरव पुरस्कार जाहीर
सांगली दि.18 : रोजी सा.मि.कु.शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक व अखिल भाविक वारकरी मंडळ सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष मा.लक्ष्मण भाऊ नवलाई यांना ए.जे. सोशल वेलफेअर फाऊंडेशन या संस्थेमार्फत गुणीजन सुवर्णमोती राज्यस्तरीय कुशल नेतृत्व लोकगौरव पुरस्कार 2021 या पुरस्कार निवडीचे पत्र नुकतेच फाउंडेशनच्या अध्यक्षा मा. अबोली जगजीनी यांनी दिली आहे.
पुरस्कार वितरण सोहळा दि.28 नोव्हेंबर 2021 रोजी मा.आमदार निलेश लंके तसेच चला हवा येऊ द्या मालिकेतील ज्येष्ठ कलाकार मा.सागरजी कारंडे व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते इचलकरंजी येथे पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप अभिलेख प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, विशेषांक, पदक व कोल्हापुरी मानाचा फेटा असे असणार आहे. अशी माहिती ओम गणेश ट्रस्टचे विश्वस्त मा. प्रकाश जाधव यांनी दिली आहे लक्ष्मण भाऊ नवलाई यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.