Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली भाजयुमो वतीने देशद्रोही मंत्री नवाब मलिक यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा व तात्काळ त्यांना अटक करावी भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष पै धीरज सूर्यवंशी

सांगली भाजयुमो वतीने देशद्रोही मंत्री नवाब मलिक यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा व तात्काळ त्यांना अटक करावी भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष पै धीरज सूर्यवंशी



सांगली ता. ११ :-  देशद्रोही मुंबई बॉम्ब ब्लास्ट मधील आरोपींच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेणाऱ्या देशद्रोही मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा ने शहर जिल्हाध्यक्ष पै धीरज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर नवाब मलिक यांचा पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत उग्र आंदोलन केले. आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यभरात आक्रमक आंदोलन करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी देशद्रोही मंत्री नवाब मलिक यांचा पुतळा दहन करून निषेध व्यक्त केला.ड्रग्ज प्रकरणात स्वतःचे जावई अडकले असल्यामुळे मानसिक संतुलन बिघडले आहे व त्यामुळे ड्रॅग प्रकरणापासून सुरू झालेले प्रकरण आता भलत्याच दिशेला घेऊन जाऊन महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचे काम सातत्याने नवाब मलिक करत आहेत. राज्यातील जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर कोणतेही भाष्य न करता रोज नवीन विषयावर बरळत राहण्यामध्ये त्यांना धन्यता वाटत आहे. आज राज्यामध्ये एसटी कर्मचारी, युवा, युवती,विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न, एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न, आरोग्यसेवक भरतीतील काळाबाजार असे अनेक विषय असताना नवाब मलिक जाणीवपूर्वक महाराष्ट्रातल्या जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम करीत आहेत. देशद्रोह्यांशी लागेबांधे असणारे देशद्रोही मंत्री नवाब मलिक यांनी पिसाळल्या प्रमाणे वागणे सोडावे अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चाचा संघर्ष सुरूच राहील असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पै धिरज सूर्यवंशी यांनी दिला आहे. 


यावेळी आमदार सुधीर दादा गाडगीळ, प्रदेश सदस्य शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे माजी आमदार  नितीन राजे शिंदे, जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, गटनेते विनायक सिंहासने, माजी महापौर संगीता खोत, प्रकाशतात्या बिरजे, संघटक सरचिटणीस दीपक माने, युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष पै धीरज सूर्यवंशी, अविनाश मोहिते, बाळासाहेब पाटील, प्रवक्ते मुन्नाभाई कुरणे अल्पसंख्यांक प्रदेश सचिव अश्रफ वांकर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष अमर पडळकर, नगरसेवक रणजित सावर्डेकर, सुजित राऊत, धनेश कातगडे, प्रियानंद कांबळे, डॉ भालचंद्र साठे, प्रदेश महिला मोर्चा प्रदेश सदस्या स्मिता पवार, ज्योती कांबळे, युवती संयोजिका दिव्या कुलकर्णी, प्रथमेश वैद्य कुपवाड मंडल अध्यक्ष रवींद्र सदामते, पूर्व मंडल अध्यक्ष दरीबा बंडगर, पश्चिम मंडल अध्यक्ष दीपक कर्वे, अनिकेत बेळगावे, अजित वाले, गंगा तिडके, माधुरी वसगडेकर, सुस्मिता कुलकर्णी, कामगार आघाडी अध्यक्ष प्रियानंद कांबळे, अनिकेत खिलारे आदी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.