सांगली शहर येथे भाजपा ‘ओबीसी जागर अभियानाच्या’ प्रचार प्रसिद्धीचा डिजिटल रथ दाखल..
सांगली ता. २५ नोव्हेंबर :- महाराष्ट्र राज्यातील महाविकास तिघाडी सरकारने ओबीसी सामाज्याचे राजकीय आरक्षण रद्द केले व ओबीसी समाज्याच्या विविध विषयांना वाचा फोडण्यासाठी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा. आमदार श्री योगेश (अण्णा) टिळेकर यांच्या सुचनेने व भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने ओबीसी जागर अभियानास सुरवात केली आहे....
या वेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले भाजप व देवेंद्रजी सरकार काळात देवेंद्रजी ने ओबीसी साठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले ,ओबीसी ना स्पेशल बजेट दिले ,कर्ज मंजुरी मर्यादा वाढवली,महाज्योती संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला, क्रिमिलियर अट 4 लाख वरून 8 लाख पर्यंत केली गेली, पण या महाअघाडी सरकार ने ओबीसी चे राजकीय आरक्षण काढून घेतले ,आता भविष्यात शासकीय आणि शैक्षणिक आरक्षण देखील काढून घेईल ,आज ओबीसी च्या वतीने महाआघाडी सरकार चा निषेध करण्यात आला सदर ‘ओबीसी जागर अभियानाच्या’ प्रचार प्रसिद्धीचा डिजिटल रथ हा सांगली शहर मध्ये दाखल झाला यावेळी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी या ओबीसी जागर रथास भेट देऊन व पुष्पहार अर्पण करून रथाचे स्वागत करून सांगली मध्ये विविध ठिकाणी प्रचारासाठी ओबीसी जागर रथास उदघाट्न केले. सांगली शहरातील प्रत्येक मंडलमध्ये या रथाचा प्रवास होणार असून. हा रथ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गणपती मंदिर, शामरावनगर, विद्यानगर, वॉन्लेसवाडी येते जाऊन रथावर असणारे डिजिटल स्क्रीन द्वारे जनतेला ओबीसी समस्या वा महाविकास आघाडी सरकारकडून होणाऱ्या अन्यायाबाबत प्रभोधन करण्यात आले. या प्रसंगी प्रदेश सदस्य शेखर इनामदार, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, माजी आमदार नितीनराजे शिंदे, सरचिटणीस दीपक माने, गटनेते विनायक सिंहासने, ओबीसी मोर्चा महिला अध्यक्ष वैशालीताई शेळके, समाजकल्याण सभापती सुब्राव मद्रासी, नगरसेविका कल्पना कोळेकर, उदय बेलवलकर, संदीप लेंगले, मनोज यमगर, युवा अध्यक्ष राहुल माने, राहुल मदने, लियाकत शेख, अजय काकडे, वरद पडळकर, नाना मगदूम आदी मान्यवर नागरिक उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.