Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संजय पांडे पोलीस महासंचालक पदासाठी अपात्र? महाराष्ट्राला नवीन पोलीस महासंचालक मिळण्याची शक्यता

संजय पांडे पोलीस महासंचालक पदासाठी अपात्र? महाराष्ट्राला नवीन पोलीस महासंचालक मिळण्याची शक्यता


मुंबई : महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांचं पद धोक्यात आलं आहे. संजय पांडे हे पोलीस महासंचालक या पदासाठी पात्र नसल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाने म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महासंचालक पदावर रुजू झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाचे क्लियरन्स लागतं. जे आता संजय पांडे यांना मिळण्याची शक्यता मावळली आ. त्यामुळे राज्याला नवीन पोलीस महासंचालक मिळणार की काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. या संदर्भात मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पत्रव्यवहाराला आता आयोगाने उत्तर दिले आहे. पांडे यांच्या नावावर फुली मारण्यात आल्याने महासंचालकपदासाठी रजनीश सेठ, डॉ.वेंकटेशम आणि हेमंत नगराळे या तीन अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस केली असल्याची माहिती आहे. मात्र काही राज्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निर्णयाला बगल दिली आहे, त्यामुळे यावर मुख्यमंत्री हेच शेवटचा निर्णय घेऊ शकतात, असं देखील बोललं जात आहे.

संजय पांडे यांनी सरकारी सेवेतून मध्यंतरात अवकाश घेऊन सुमारे दोन वर्षे खासगी क्षेत्रात सेवा केली होती. दोनदा सेवेत नसलेल्या अधिकाऱ्याला पोलीस महासंचालक करण्यास विरोध केला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. अखेर ही भीती अखेर खरी ठरली आहे. लोकसेवा आयोगाच्या 1 नोव्हेंबरला झालेल्या शिफारसी या 10 नोव्हेंबरच्या सुमारास मुंबईत पोहोचल्या आहेत. संजय पांडे यांना पदावरुन पायउतार व्हावं लागल्यास आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख रजनीश सेठ, गृहरक्षक दलाचे महासंचालक डॉ.के.वेंकटेशम आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यापैकी एकाची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड केली जाऊ शकते.

संजय पांडे सेवेत असताना त्यांनी अवकाश घेत खाजगी सेवेतही काम केलं जे त्यांच्या विरोधात गेलं. सरकारी अधिकारी अशा प्रकारे अवकाश घेऊन खाजगी सेवेत कसा काम करू शकतो असाही प्रश्न केंद्रीय लोसेवा आयोगाच्या पुढे उपस्थित झाला. मात्र यावर आता राज्य सरकारची नेमकी काय भूमिका असेल ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. संजय पांडे यांच्या आधी सध्या मुंबईचे पोलिस आयुक्त असलेले हेमंत नगराळे हे राज्याचे पोलिस महासंचालक होते. परमबीर सिंह यांना मुंबई पोलिस आयुक्त पदावरुन पायउतार व्हावं लागल्यानंतर त्यांच्या जागी नगराळेंनी मुंबई पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर पांडे यांची महाराष्ट्राच्या महासंचालक पदी वर्णी लागली होती.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.