Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वरुण गांधी-कंगनामध्ये जुंपली; वरुण गांधीं म्हणाले,'असा विचार म्हणजे मूर्खपणा की देशद्रोह

 वरुण गांधी-कंगनामध्ये जुंपली; वरुण गांधीं म्हणाले,'असा विचार म्हणजे मूर्खपणा की देशद्रोह


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा तिच्या वक्तव्याने वाद निर्माण केला आहे. 1947 साली स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 साली मिळालं असे वादग्रस्त वक्तव्य तिने केले होते.

त्याला उत्तर देताना भाजपचे खासदार वरुण गांधींनी तिच्यावर निशाणा साधला आहे. कंगनाला 'या विचारांना मूर्खपणा म्हणायचा की देशद्रोह' असा सवाल त्यांनी विचारला होता. आता कंगनानेही त्यांना प्रत्युत्तर दिले असून गांधींच्या कटोऱ्यात आपल्याला स्वातंत्र्याची भीक दिली असल्याचे तिने म्हटले आहे.

एका मुलाखतील बोलताना कंगना राणावत म्हणाली होती की, 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य ही भिक होती, खरं स्वांतत्र्य तर नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर म्हणजे 2014 साली मिळालं आहे. कंगनाच्या या वक्तव्याला उत्तर देताना भाजप नेते वरुण गांधी यांनी तिच्यावर टीका केली.

वरुण गांधींनी एक ट्वीट करत म्हटलं आहे की, 'कधी महात्मा गांधींच्या तपस्येचा अपमान, तर कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान आणि आता मंगल पांडेंपासून राणी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र आणि लाखो स्वातंत्र्यसेनानींच्या बलिदानाचा तिरस्कार केला आहे. या विचाराला मूर्खपणा म्हणायचा की देशद्रोह?'


वरुण गांधींच्या या ट्वीटला कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर लगेच प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ती म्हणते की, 'मी सांगितलं आहे की 1857 मध्ये स्वातंत्र्याची पहिली लढाई झाली, ती दाबण्यात आली. त्यानंतर ब्रिटिशांनी आपले अत्याचार आणि क्रुरता वाढवली. त्यानंतर गांधींच्या कटोऱ्यात आपल्याला स्वातंत्र्याची भीक मिळाली.'


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.