Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिकेतील कर्मचार्या वरील अन्याय दूर न केल्यास राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचा आंदोलनाचा इशारा. . .

महापालिकेतील कर्मचार्या वरील अन्याय दूर न केल्यास राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचा आंदोलनाचा इशारा. . .


          राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ तथा आर एम बी के एस सांगली ,शाखा महापालिका सांगली च्यावतीने आज सोमवारी दि.१/११/२०२१ रोजी  जिल्हाद्यक्ष मा.प्रशांत रणधीर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या कर्मचा यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात मा. आयुक्त यांच्या गैरहजेरीत उपायुक्त मान.  राहुल रोकडे साहेब यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी मानधन कर्मचारी यांची ज्या कामासाठी व ज्या विभागात निवड झाली आहे ,त्याच कामासाठी व त्याच विभागात नियुक्ती करावी.आयुक्तांनी सेवाज्येष्ठता यादी बनवून कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता व सेवाज्येष्ठता  यादी पाहूनच कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी.आरोग्य व सफाई कर्मचारी यांना आवश्यक प्रशिक्षण देऊन कुशल बनवून त्यांना आरोग्यविषयक सोयीसुविधांचा व साधनांचा लाभ नियमितपणे देण्यात यावी.

महापालिकेतील सर्व विभागांमध्ये सर्व प्रवर्गाची रिक्त असलेली पदे नियमितपणे भरून मागासवर्गीयांचा अनुशेष पूर्ण करण्यात यावा.सर्व कर्मचाऱ्यांची मासिक वेतन व मासिक वेतनाची चिठ्ठी दरमहा विनाविलंब वेळेतच देण्यात यावी. खाजगीकरण धोरण बंद करून कर्मचाऱ्यांची भरती नियमित व कायमस्वरूपी करण्यात यावी .या प्रमुख मागण्यांसह एकूण पंधरा मागण्यांचे निवेदन या वेळी संघटनेच्या मार्फत मा .उपायुक्त राहुल रोकडे साहेब यांना देण्यात आले.याप्रसंगी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष मिलिंद मौर्य व जिल्हा महासचिव मा.प्रल्हाद मलमे यांनीही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात आपली मते उपायुक्त समोर मांडलीत.यावेळी माननीय उपआयुक्त रोकडे साहेब यांनीही कर्मचाऱ्यांच्या जास्तीत जास्त मागण्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन संघटनेला दिले.या वेळी संघटनेचे पदाधिकारी मा. सागर बळवंत, शिवाजी त्रिमुखे ,गौतम सिंगे, प्रभाकर केंगार,  सुमंत भाले, आकाश कांबळे ,बळवंत लोखंडे सलीम शेख ,डी के पाटील ,जयशिंग कोळी   उपस्थित होते.

  सदरची बातमी आपल्या सुप्रसिध्द दैनिकात देऊन प्रसिद्धीस द्यावी ही नम्र विनंती आहे. 

आपले विनित- प्रशांत रणधीर 9960339829

जिल्हाद्यक्ष- RMBKS  सांगली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.