महापालिकेच्या सफाई मित्राना सुरक्षित ड्रेनेज चेंबर सफाईचे प्रशिक्षण
सांगली : सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज अंतर्गत सफाई मित्रानी सुरक्षित ड्रेनेज चेंबर सफाई कशी करावी याबाबत पुणे येथील कॅम फौंडेशनकडून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता मित्र, निरीक्षक, मुकादम यांना प्रशिक्षण दिले. दोन दिवस सुरू असणाऱ्या या प्रशिक्षणात मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली 57 सफाई मित्राना प्रशिक्षण देण्यात आले.
सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या ड्रेनेज चेंबरची सुरक्षित सफाई कशी करावी आणि मशीनच्या साहायाने ही सफाई कशी करावी याबाबत पुण्याच्या कॅम फौंडेशनकडून महापालिकेच्या सफाईमित्राना प्रशिक्षण देण्यात आले.
यामध्ये ड्रेनेज होलची सुरक्षित सफाई कशी करावी, सफाई करताना मशीनचा अधिक वापर कसा करावा याबाबतचे कॅमचे प्रशिक्षक राकेश पवार यांनी सफाई मित्राना दिले. तसेच मशीनद्वारे प्रत्यक्ष ड्रेनेज होल सफाई करण्याबाबत प्रात्यक्षिक सुद्धा दाखवण्यात आले. यासाठी आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, अनिल पाटील, ड्रेनेज विभागाचे अभियंता तेजस शहा यांच्या उपस्थितीत दोन दिवस हे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे आता महापालिका क्षेत्रात ड्रेनेज सफाई करणाऱ्या सफाई मित्राना सुरक्षित स्वच्छता करता येणार आहे. यामुळे ड्रेनेज होलमधे असुरक्षित पणे काम करत असताना होणाऱ्या दुर्घटना टाळता येणार आहे याचबरोबर मशीनच्या साहायाने सुरक्षित स्वच्छता केल्यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्यही राखता येणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.