Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मुलीने कंगनाला फटकारलं, दिली महत्वाची माहिती

 नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मुलीने कंगनाला फटकारलं, दिली महत्वाची माहिती


मुंबई : अनिता बोस या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या आहेत. अनिता बोस यांनी बॉलिवूड क्वीन कंगना रानौतला फटकारलं आहे. कंगनाने महात्मा गांधी आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यावर भाष्य केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर खूप मोठा गदारोळ निर्माण झाला होता.

अनिता बोस यांचं कंगनाला सडेतोड उत्तर

अनिता बोस यांनी वडील नेताजी सुभाष चंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्यातील संबंधांवर त्यांचे मत मांडले आहे. अनिता यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेताजी आणि महात्मा गांधी यांच्यात गुंतागुंतीचे नाते होते. त्यांच्या मते, गांधीजींना वाटले की ते नेताजींवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.

अनिता बोस यांनी कंगनाला फटकारलं

गेल्या आठवड्यात अभिनेत्री कंगना रानौत म्हणाली की, महात्मा गांधींनी सुभाषचंद्र बोस यांना पाठिंबा दिला नाही. गांधीजी नेताजींना ब्रिटिशांच्या ताब्यात देण्यास तयार आहेत. या संवादात जर्मनीत राहणाऱ्या अनिता बोस यांनी मोठा खुलासा केला आहे.

"मला अशा घटनांची माहिती नाही. यावर आता चर्चा करणे योग्य नाही. मला असे वाटते की, स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांनी आणि लाखो अनोळखी व्यक्तींचं स्वातंत्र्य मिळवण्यात योगदान दिले. महात्मा गांधी आणि माझ्या वडिलांचे नाते गुंतागुंतीचे होते. गांधीजींना वाटले की ते माझ्या वडिलांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.


नेताजी गांधीजींचे मोठे प्रशंसक

अनिता बोस यांनी पुढे हे देखील सांगितले की, त्यांचे वडील गांधीजींचा खूप आदर करतात आणि एवढेच नव्हे ते त्यांचे खूप चाहते होते. "मला असेही वाटते की माझे वडील गांधीजींचे खूप मोठे चाहते होते. महात्मा गांधींनी त्यांच्या कार्यावर कशी प्रतिक्रिया दिली हे जाणून घेण्याची त्यांना नेहमीच उत्सुकता असायची. त्यांना गांधीजींचे जर्मनीतील भाषण आणि त्यांच्या चळवळीबद्दल काय म्हणायचे होते हे जाणून घ्यायचे होते. त्यामुळे ते दोघे एकमेकांचे शत्रू होते असे म्हणणे हा पूर्णपणे एकतर्फी दृष्टिकोन आहे."

उद्देश एकच मात्र विचार वेगळे

अनिता बोस यांनी गांधीजी आणि नेताजी यांच्यातील संबंधांबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरे देताना असेही सांगितले की, या दोन्ही नेत्यांचा उद्देश एकच होता, परंतु त्यांचे विचार सारखे नव्हते. पुढे त्या म्हणाल्या "दोघेही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढत होते. पण दुसरीकडे, हे कसे साध्य करायचे याविषयी दोघेही एकमेकांच्या मतांशी सहमत नव्हते.

'स्वातंत्र्य केवळ अहिंसेने मिळालेले नाही'

सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांच्या मते, स्वातंत्र्य केवळ अहिंसेमुळे मिळालेले नाही, ते मिळवण्यात नेताजी आणि गांधीजी दोघांची भूमिका महत्त्वाची होती, आणि ते नाकारता येणार नाही. इंडिया टुडेशी संवाद साधताना ते म्हणाले.

"हे दोघेही भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले महान वीर होते. त्यांच्यापैकी कोणीही ही लढाई लढू शकले नाही.जरी काँग्रेसच्या काही सदस्यांनी अहिंसक धोरणामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले असा दावा केला आहे. पण तसे नाही, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेताजी आणि आयएनएच्या कृतींचाही हातभार लागला हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र, केवळ नेताजी आणि त्यांच्या आझाद हिंद फौजेनेच आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, असे म्हणणेही मूर्खपणाचे ठरेल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.