Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रंथालयाचा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रंथालयाचा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 10,  : जिल्ह्याचा महत्वपूर्ण कारभार चालणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसेंदिवस कामाचा व्याप वाढत आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांनाही अभ्यासपूर्ण माहिती, कायद्यांविषयी माहिती असणे तसेच इतरही अवांतर वाचन होणे काळाची गरज आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. याचा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ग्रंथालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सुमारे 5 लाख रूपये खर्च करून ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. या ग्रंथालयाचा सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी उपयोग करून घ्यावा. 

हे ग्रंथालय अधिक सुसज्ज करण्यासाठी पुढील काळात आवश्यकतेनुसार जिल्हा नियोजन समिती मधून नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून दिला नाईल. याचबरोबर इंटरनेटने सुसज्ज रिडींग रूम ही पुढील काळात सुरू करण्यावर भर देण्यात येईल. 


त्याचबरोबर डिजीटल लायब्ररीही सुरू करण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी पुढे म्हणाले, या ग्रंथालयाचा वापर करताना सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना आवश्यक वाटणाऱ्या सुविधा व सूचना प्रशासनास कळवाव्यात. या ग्रंथालयात बहुभाषिक पुस्तके उपलब्ध करून देण्यावरही पुढील काळात भर देण्यात येईल. त्यासाठी या क्षेत्रात आवड असलेल्या एका सक्षम अधिकाऱ्याची यासाठी नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.