दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या डोंबिवलीकर तरुणाची धक्कादायक माहितीसमोर
डोंबिवली, 28 : दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळून आल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. राज्यात सुद्धा कडक पाऊल उचलली जात असताना दक्षिण आफ्रिकेवरून आलेल्या एका प्रवासी पॉझिटिव्ह आढळला आहे.
धक्कादायक म्हणजे, या तरुणाने कोरोनाची चाचणी न करत देशभर फिरत असल्याचे समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेचा केपटाऊन शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची कल्याण डोंबिवली आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार असून त्याला ओ मायक्रोनची लागण झाली आहे का हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
तर या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्याच्या कुटुंबाची तपासणी उद्या केली जाणार असल्याचे महापालिकेच्या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितलं. डोंबिवलीमध्ये हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण राहत असून मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारी ही व्यक्ती असून, या व्यक्तीचे लसीकरण झाले नाही. असं असून सुद्धा त्याने विमानाने प्रवास केला आणि लसीकरण न झाल्याने हा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे वरीष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
गेली ७ महिने हा तरुण कामानिमित्त अनेक देशात फिरला असून मर्चंट नेव्हीत असल्याने तो सतत समुद्रात प्रवास करत असल्याने लसीकरण झाले आहे की नाही याबाबत त्याला कधीच विचारणा झाली नाही.
तसंच लसीकरण करण्यात अडचणी देखील होत्या, अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगर पालिका आरोग्य विभागाला मिळाली आहे. या तरुणाला स्वतंत्र क्वारनटाईन केले असून तो साऊथ आफ्रिकेहून आलाय. त्यात तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यात आफ्रिकेत ओमीक्रॉनचा फैलाव जास्त असल्याने डोंबिवलीत भितीचे वातावरण निर्माण झालंय. काही महिन्यांपूर्वी, डोंबिवलीमध्ये कोरोनाचा शिरकाव देखील डोंबिवलीतील रहिवाशी असलेल्या पण परदेशातून परत आलेल्या तरुणामुळे झाला होता. आपण परदेशातून आलोय आपल्यात कोरोनाची लक्षण आहेत हे माहिती असून सुद्धा तो तरुण लग्न समारंभात सामिल झाला होता. यामुळेच डोंबिवलीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.