Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या सुंदरनगरमध्ये रंगला पोलीस आणि वारंगणाचा भाऊबीज सोहळा: वारांगणाचे भाऊ म्हणून उभे राहिले पोलीस: या अनोख्या भाऊबीजेने वातावरण गहिवरले

सांगलीच्या सुंदरनगरमध्ये रंगला पोलीस आणि वारंगणाचा भाऊबीज सोहळा: वारांगणाचे भाऊ म्हणून उभे राहिले पोलीस:  या अनोख्या भाऊबीजेने वातावरण गहिवरले


सांगली : सांगलीत सुंदरनगर वेश्यावस्तीमध्ये पोलीस आणि वारंगणाचा भाऊबीज सोहळा चांगलाच रंगला.  या वस्तीतील वारांगणाचे भाऊ म्हणून पोलीस उभे राहिले. या अनोख्या भाऊबीजेने वातावरण गहिवरले होते.

आज भाऊबीज सर्वत्र साजरी होत आहे मात्र अनेक घटक असे आहेत की त्यांना भाऊबीज साजरी करता येत नाही. तर काही अडचणीमुळे आपल्या घरीही जाता येत नाही. सांगलीच्या सुंदर नगर वेश्या वस्तीमधील वारांगणाची हीच अवस्था आहे. त्यामुळे आशा महिलांना हक्काचे भाऊ मिळावेत म्हणून सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण हर सातत्याने प्रयत्न करत आहेत. आज भाऊबीजेचा अनोखा सोहळा वेश्यावस्तीतच साजरा झाला. 


यावेळी सांगली शहर पोलीस निरीक्षक अजय सिंधकर आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या महिलांचे भाऊ म्हणून हजेरी लावली. यावेळी पोलीस बांधवाना आपले भाऊ म्हणून ओवळताना अनेक महिलांना गहिवरून आले होते. दीपक चव्हाण, जावेद कुरणे, सैफिना शेख, राधा हातलंगे, मल्लवा हिरामनी आदींसह महिलांची उपस्थिती होती. यावेळी आपल्या अश्रूंना रोखत पोलिसांसमवेत वारंगणांनी आपली भाऊबीज साजरी करीत आपल्या भावना वाट करून दिली. या हृद्यस्पर्शी कार्यक्रमामुळे पोलिसही भारावून गेले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.