Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महागाईविरोधात काँग्रेसचे आज जनजागरण अभियान मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध उठाव - पृथ्वीराज पाटील

महागाईविरोधात काँग्रेसचे आज जनजागरण अभियान मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध उठाव  - पृथ्वीराज पाटील


सांगली, दि.२७ : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कृत्रिमरित्या महागाई वाढवून देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. महागाई विरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेसच्यावतीने उद्या रविवार, दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी सांगली ते हरिपूर यादरम्यान जनजागरण अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी दिली.

 ते म्हणाले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या  निर्देशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांच्या आदेशावरून हे आंदोलन करण्यात येत आहे. आधुनिक भारताचे शिल्पकार, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती ( १४ नोव्हेंबर ) दिनापासून  २९ नोव्हेंबरपर्यंत राज्यभर जनजागरण अभियान राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्या सांगलीत डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सकाळी दहा वाजता जनजागरण अभियान सुरू होत आहे, आणि ते हरिपूरला संगमेश्वर मंदिरापर्यंत जाणार आहे. पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किंमतीच्या विरोधात जोरदार आवाज उठवला जाणार आहे.

ते म्हणाले, मोदी सरकारने लादलेली महागाई, बेरोजगारी, शेतकरी व कामगांरांवरील अन्याय, लोकशाहीचे विद्रुपीकरण यावर काँग्रेसने सातत्याने आवाज उठवला आहे. घटना बचावासाठीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्याच्या आंदोलनात सांगली ग्रामीण आणि शहर जिल्हा काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते, महिला, युवक, एनएसयूआय, सेवादल, आणि पक्षाच्या इतर संघटना सहभागी होणार आहेत सर्वसामान्य लोकांनीही महागाई विरोधातील या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.