Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाड्याच्या घरात राहात असतानाही प्राप्तीकरात मिळते सूट; जाणून घ्या काय आहेत नियम आणि अटी

 भाड्याच्या घरात राहात असतानाही प्राप्तीकरात मिळते सूट; जाणून घ्या काय आहेत नियम आणि अटी


नवी दिल्ली :  तुम्हाला घरभाड्याच्या रूपात दिलेल्या रक्कमेवर प्राप्तीकरात सूट मिळवायची असेल तर, सर्वात पहिली अट पगारदार असण्याची आहे.

तुमच्या वेतनात हाऊस रेंट अलाऊन्सचा (HRA) समावेश असतो, ज्यावर प्राप्तीकर कलम 10(13E) अंतर्गत ठराविक मर्यादेपर्यंत करसवलत दिली जाते. 

जाणून घ्या काय आहेत नियम आणि अटी

बहुतांश कंपन्यांमध्ये काम करत असलेल्या कर्मचार्‍यांसाठी हाऊस रेंट त्यांच्या सॅलरीचा भाग मानला गेला आहे. प्राप्तीकर कायदा 1961 मध्ये कर्मचार्‍यांना दिलेल्या घराच्या भाड्यावर कपातीचा दावा करण्याची तरतूद लागू करण्यात आली होती. असे कर्मचारी प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80GG च्या अंतर्गत भरलेल्या घरभाड्यावर सवलतीचा दावा करू शकतात.

सोबतच हा नियम स्वयंरोजगार करणार्‍यांसाठी सुद्धा लागू होतो, परंतु सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी काही नियम आणि अटी जाणून घेणे आवश्यक आहे. जसे की कलम 80GG अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी कर्मचार्‍याला आर्थिक वर्षादरम्यान एचआरए मिळालेला नाही पाहिजे.

HRA मध्ये सवलतीचा दावा करणारा करदाता कलम 80GG अंतर्गत भरलेल्या भाड्यावर कपातीचा दावा करू शकत नाही. सोबतच कलम 80GG अंतर्गत कपातीचा दावा करणार्‍या व्यक्तीचे शहरात कोणतेही घर नसावे.

प्रत्यक्षात ज्या शहरात कार्यालय आहे किंवा व्यवसाय केला जात आहे, त्या शहरात पती किंवा पत्नी,

अल्पवयीन मुले किंवा हिंदू अविभाज्य कुटुंबाच्या नावावर कोणतेही घर नसावे.

काम करत असलेल्या शहरात घर असेल तर कपातीचा दावा करता येणार नाही.

कसा मिळेल कपातीचा लाभ?

करदात्याला एक फॉर्म 10BA दाखल करावा लागेल, ज्यानंतर तो या कपातीचा दावा करू शकतो. ज्या करदात्याने पर्यायी किंवा नवीन करव्यवस्थेचा पर्याय निवडला असेल, तो या कपातीचा दावा करूशकणार नाही. कपातीची गणना एका सूत्राच्या आधारावर केली जाते. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.