Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तळीरामांची चिंता वाढली, दारू विकत घ्यायची असल्यास आता.

 तळीरामांची चिंता वाढली, दारू विकत घ्यायची असल्यास आता.


औरंगाबाद : कोरोना महामारीने  संपुर्ण देशभरात हाहाकार माजवला होता. त्यातच देशभरात आता कोरोना आटोक्यात आला असताना कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत असताना अनेक लोक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचं समोर आलं होतं.

कोविडविषयी सर्व लेटेस्ट अपडेट येथे वाचा

त्यात कोरोना लसीकरण  मोहीम राबवली जात असताना सध्या याला प्रोत्साहन देण्यासाठी औरंगाबाद प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी लसीकरणाला वेग मिळावा यासाठी लस नाही तर दारू नाही,  ही मोहिम जिल्हाभरात राबवण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान, औरंगाबाद  जिल्ह्यात अनेक ठिकाणी लसींचा मोठ्या प्रमाणात साठा तसाच पडून राहत असल्याचं समोर आलं होतं. तसेच त्यासाठी पर्याय म्हणून आणि नागरिकांनी लसीकरणात सहभागी व्हावं यासाठी जिल्हा प्रशासनाने कोरोना लसीकरण केलं नसेल तर दारू देण्यात येऊ नये, असे आदेश जारी केले आहेत.

दारू विक्री करणाऱ्या दुकानातील सर्व कर्मचारी व मालकाचे दोन्ही लसीचे डोस पुर्ण होणं बंधनकारक असणार आहे. तसेच दारू विकत घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा कोरोना लसीचा किमान एक डोस पुर्ण होणं गरजेचं आहे. त्यामुळे आता तळीरामांची चांगलीच दैना होणार असल्याचं या निर्णयातून स्पष्ट होत आहे. तसेच लसीकरणाचा टक्का या निर्णयामुळे वाढणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.