Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली मिरज आणि कुपवाड शहर मनपा कार्यक्षेत्रात १३ नोव्हेंबर पासून हेरिटेज वृक्षगणना होणार:

 सांगली मिरज आणि कुपवाड शहर मनपा कार्यक्षेत्रात १३ नोव्हेंबर पासून हेरिटेज वृक्षगणना होणार:


अंदाजित 973 हेरिटेज वृक्षांचे होणार जिओ टॅगिंग: आता आपल्या शहरातील हेरिटेज वृक्ष दिसणार गुगल मॅपवर : उपायुक्त राहुल रोकडे यांची माहिती

सांगली: माजी वसुंधरा अभियांच्या अंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर मनपा कार्यक्षेत्रात शनिवार दिनांक 13 नोव्हेंबर पासून हेरिटेज वृक्ष गणना केली जाणार आहे. यामध्ये 50 वर्षावरील सर्व वृक्षांची गणना व जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, चंद्रकांत आडके यांच्या देखरेखीखाली ही वृक्ष गणना आणि त्याचे जिओ टॅगिंग केले जाणार आहे.

           या हेरिटेज वृक्ष गणनेमध्ये मनपा क्षेत्रात यापूर्वी करण्यात आलेल्या 973 जुन्या सर्व वृक्षांचे जिओ टॅगिंग केले जाणार आहे. या मोहिमेचे जिओ टॅग केलेल्या सर्व वृक्षावर विशिष्ठ नोंदणी चिन्ह लावले जाणार आहे. यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी वृक्ष गणना अँप तयार केले असून यामध्ये सर्व स्वच्छता निरीक्षक, मुकादम हे जिओ टॅगिंग अँपवर या वृक्षांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी आणि टॅगिंग करणार आहेत. 13 ते 15 नोव्हेंबर 2021 या तीन दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. या जिओ टॅगिंगमुळे आता गुगल मॅपवर आपल्या महापालिका क्षेत्रातील सर्व हेरिटेज वृक्ष पाहता येणार आहेत. या ऍपमध्ये त्या वृक्षाचे प्रजातीचे नाव, वय , व्यास आणि झाडाची माहिती नोंद केली जाणार आहे. तसेच त्या वृक्षाचे छायाचित्रसुद्धा ऍपमध्ये समाविष्ट केले जाणार आहे. या तीन दिवसीय वृक्ष गणना आणि जिओ टॅगिंगचे  प्रशिक्षण सर्व स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक आयुक्त यांना मनपा मुख्यालयात सर्वाना देण्यात आले. यावेळी मनपा उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे , उद्यान पर्यवेक्षक गिरीश पाठक यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.