Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुमच्या मोबाईलमध्ये जिओचं सिम आहे का? जिओला सर्वात मोठा धक्का

 तुमच्या मोबाईलमध्ये जिओचं सिम आहे का? जिओला सर्वात मोठा धक्का


मुंबई : टेलिकॉम क्षेत्रात  क्रांती घडवणाऱ्या जिओला  आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीने (TRAI) एक आकडेवारी जाहीर केली आहे.

त्या आकडेवारीनुसार जिओला दणका बसलाय. सप्टेंबरमध्ये रिलायन्स जिओला एकूण 1.9 कोटी ग्राहकांनी डच्चू दिला आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर एकूण 1.9 कोटी यूझर्सनी सप्टेंबरमध्ये जिओची सेवा वापरणं बंद केलं. तर दुसऱ्या बाजूला एअरटेलला  मजबूत फायदा झाला आहे. तर याच कालावधीत एअरटेलसोबत एकूण 2 कोटी 74 लाख नवे ग्राहक जोडले गेले आहेत. म्हणजेच 2 कोटी 74 लाख जणांनी एअरटेची सेवा वापरण्यास सुरुवात केली.सप्टेंबरमध्ये एअरटेलचा सब्सक्रायबर बेस हा 35.44 कोटीवर जाऊन पोहचला आहे. हाच आकडा ऑगस्टमध्ये 35 कोटी 41 लाख इतका होता. याच तुलनेत जिओचे मोबाईल यूजर्स हे एकूण 42 कोटी 48 लाख इतके होते.

एकाबाजूला एअरटेलचं मार्केट जोरात असताना दुसऱ्या बाजूला व्होडाफोन आणि आयडियाला उतरती कळा लागलीय. सप्टेंबर महिन्यात एकूण 10 कोटी 77 लाख जणांनी व्हीची सेवा वापरणं बंद केलं. ताज्या आकडेवारीनुसार व्हीचे एकूण 26 कोटी 99 लाख मोबाईल यूजर्स आहेत.

ट्रायच्या रिपोर्टनुसार, सप्टेंबरमध्ये एअरटेलच्या मोबाईल यूजर्सच्या मार्केट शेअरमध्ये 0.08 ने वाढ झाली. तर जिओट्या यूजर्समध्ये 4.29 टक्क्यांनी घसरण झाली. जिओने सप्टेंबरच्या तिमाहीत निकाल जाहीर करताना नुकसान झाल्याचा खुलासा केला होता. तसंच याबाबतची सविस्तर माहिती दिली होती.

रिलायन्स जिओ इन्फोकॉमची बाजू

रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष किरण थॉमस आहेत. थॉमस म्हणाले होते की, आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत कोरोनामुळे सर्वसामांन्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. यादरम्यान आम्ही यूझर्स आमच्याशी जोडले जावोत यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केले.

यूझर्सन अधिक बोलता यावं यासाठी आम्ही काही मिनिटं मोफत दिली होती. मात्र अनेक यूझर्स हे या काळात रिचार्जबाबत सजग राहिले नाहीत. पॉलिसीनुसार कंपनीने जवळपास 90 दिवस याचा डेटाबेस राखून ठेवला होता. या यूजर्सचा परिणाम एकूण एकूण ग्राहक संख्येवर दिसून येतोय. या कारणामुळेच या तिमाहीत जवळपास 1 कोटी 1 लाख इतकी घसरण दिसून येत आहे, असंही थॉमस यांनी नमूद केलं होतं.

ऑगस्टमध्ये देशात एकूण मोबाईल यूजर्सची संख्या ही 180 कोटी इतकी होती. याच आकड्यात सप्टेंबरमध्ये घट होवून 160कोटी इतका झाला. एकूणच या आकडेवारीत 1. 74 टक्क्यांनी मासिक घसरण झाली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.