जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सांगली संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान व मतमोजणी केंद्र परिसरात मनाई आदेश जारी
सांगली, दि. 17, : सांगली जिल्ह्यामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सांगली संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन 2021 ते 2026 चे मतदान दि. 21 नोव्हेंबर 2021 रोजी व मतमोजणी दि. 23 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे. जिल्ह्यामध्ये मतदान व मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, शांतता रहावी, तसेच कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारानुसार मतदान केंद्रे व मतमोजणी केंद्राच्या इमारतीपासून 200 मिटर सभोवतालच्या परिसरात मतदान केंद्राच्या ठिकाणी दि. 21 नोव्हेंबर 2021 रोजीचे सकाळी 6 वाजल्यापासून ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत व मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी दि. 23 नोव्हेंबर 2021 रोजीचे सकाळी 6 वाजल्यापासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत पुढील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.
दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गटागटाने फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक या संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परवानगी शिवाय मोबाईल, पेजर नेण्यास मनाई केली आहे.
मतदान केंद्रे पुढीलप्रमाणे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. 1, बस स्थानक समोर, दक्षिणाभिमुखी पश्चिमेकडील खोली क्र.2, आटपाडी, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांची शाळा नं. 2, कवठेमहांकाळ, विटा नगरपरिषदेचे लोकनेते मा. हणमंतराव पाटील प्राथमिक विद्यामंदिर, विटा, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नं. 3, शिवानुभव मंडप, जत, चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर, तळमजला तासगाव, आदर्श शिक्षण मंदिर, कल्ला परिसर, मिरज (खोली क्र. 1), इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूर खोली क्र. 12, इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूर खोली क्र. 14, न्यू इंग्लिश स्कूल शिराळा (हायस्कूलचा दक्षिण-पश्चिम कोपरा हॉल), लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर, पलूस (खोली क्र. 4), जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नं. 2 कडेगाव (पूर्वाभिमुख इमारत, दक्षिणेकडून खोली क्र. 2), सांगली महानगरपालिकेची प्राथमिक मराठी मुलांची शाळा नं. 1 भारती विद्यापीठ इमारतीजवळ, सांगली (पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील विद्यामंदिर, खोली क्र. 4 तळमजला).
मतमोजणीचे ठिकाण सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतकरी भवन, मार्केट यार्ड, मिरज हे आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.