Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एनिमल वेलफेयर ऑफीसरपदी आदित्यराज घोरपडे

 एनिमल वेलफेयर ऑफीसरपदी आदित्यराज घोरपडे


सांगली : भारत सरकारच्या एनिमल वेलफेयर बोर्ड ऑफ इंडियाच्या "होनररी एनिमल वेलफेयर ऑफीसर"पदी सांगलीचे डॉ. आदित्यराज सुभाष घोरपडे यांची नियुक्ती झाली आहे. यावर्षी केंद्र शासनाच्या या पदावर नियुक्ती होणारे घोरपडे हे महाराष्ट्रातील एकमेव आहेत. 

      देशभरातून विविध राज्यातील प्राणी कल्याण विषयक कार्य करणाऱ्या एकूण पन्नास व्यक्तींचे एनिमल वेलफेयर ऑफीसर पदी नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. एनिमल वेलफेयर बोर्डाकडून हरियाणा येथे झालेले प्रशिक्षण शिबीर व साठ गुणांची लेखी परीक्षा घोरपडे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या 2021 च्या  होनररी एनिमल वेलफेयर ऑफीसरच्या यादीत अनुक्रमांक 40 ला घोरपडे यांच्या नावाची नोंद आहे.  

      देशात प्राणी कल्याण विषयक कामकाज पार पाडण्यासाठी भारत सरकारने 1962 साली एनिमल क्रुएल्टी एक्ट 1960 च्या कलम 4 नुसार एनिमल वेलफेयर बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना केली आहे. भारत सरकारच्या पशु संवर्धन मंत्रालयांतर्गत या बोर्डचे काम चालते. पूर्वी या बोर्डचे मुख्यालय चेन्नई (तामिळनाडू) येथे होते. आत्ता ते हरियाणा येथे स्थलांतरित झाले आहे. 

      डॉ. घोरपडे हे गेली 15 वर्षे केंद्रीय मंत्री मनेकाजी गांधी संचलित पिपल फॉर एनिमल या देशव्यापी संस्थेच्या माध्यमातून प्राणी कल्याण विषयक कार्य करीत आहेत. पक्ष्यांसाठी घरटी, भटक्या जनावराना पिण्याच्या पाण्याची सोय करणे, जखमी पशुंना खाद्य पुरवणे, गाईंसाठी चारा संकलन, भटक्या कुत्र्यांची नसबंदी आदी विविध कार्य घोरपडे यांनी निस्वार्थी भावनेने केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवून भारत सरकारच्या एनिमल वेलफेयर बोर्डाच्या "होनररी एनिमल वेलफेयर ऑफीसर"पदी डॉ. घोरपडे यांची नियुक्ती झाली आहे.


 घोरपडे हे पिपल फॉर एनिमलचे सांगली शहराध्यक्ष असून महापालिकेच्या श्वान नियंत्रण कमिटीचे सदस्य  देखील आहेत. ग्राहक पंचायतीचे ते माजी जिल्हाध्यक्ष असून ऊर्जामित्र, रेल्वेमित्र, विशेष कार्यकारी अधिकारी, महामित्र, एनिमल केअर टेकर आदी पदांवरही ते कार्यरत आहेत. बोर्डचे सेक्रेटरी एस. के. दत्ता यांच्या स्वाक्षरीचे निवडपत्र घोरपडे यांना प्राप्त झाले आहे. घोरपडे यांना जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. ए. धकाते व पीपल फॉर एनिमलचे जिल्हाध्यक्ष अशोक लकडे यांचे मार्गदर्शन लाभले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.