Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'कोवीड योद्धा सन्मानाने' श्री. भगवान महावीर कोवीड हॉस्पिटलचे मुख्य समन्वयक सुरेश पाटील सन्मानित

'कोवीड योद्धा सन्मानाने' श्री. भगवान महावीर कोवीड हॉस्पिटलचे मुख्य समन्वयक सुरेश पाटील सन्मानित


सांगली: गेल्या दीड वर्षापासून कोरना साथीने थैमान घातलेले असताना सामाजिक बांधिलकीतून केलेल्या रुग्णोपयोगी उत्कृष्ट कार्याबद्दल श्री भगवान महावीर कौवीड हॉस्पिटलचे हॉस्पिटलचे मुख्य समन्वयक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांचा सन्मान स्व. बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ४थ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये नगर विकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते 'कोवीड योद्धा सन्मान' देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर अभिनेत्री दीपाली सय्यद, आमदार निलेश लंके तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका आदीसह कोवीड संकट काळात कोरोना बाधितांना मदतीचा हात देणाऱ्या मान्यवरांचाही कोवीड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विधी आणि न्याय विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे, कामगार, शिक्षण आणि सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू, पद्मश्री ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ डॉ. तात्याराव लहाने, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे म्हणाले, कोरोना काळात समाजातील विविध संघटना, डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवक यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच महाराष्ट्र कोरोनावर यशस्वी मात करू शकला. या कोवीड संकट काळात कोरोना बाधितांना वेगवेगळ्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरु होता. त्यामध्ये प्रामुख्याने रुग्णालयांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. या पुरस्काराने सन्मान करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील निवडक ५० रुग्णालयांचा विशेष सन्मान हा गौरवास्पद आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून ठाण्याच्या छोट्याशा ऑफिसमधून सूरु करण्यात आलेला हा आरोग्ययज्ञ यापुढेही अखंडितपणे सुरू रहावा अशी इच्छा त्यांनी बोलताना व्यक्त केली.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पक्ष हा आमदार खासदार यांच्यापेक्षा कार्यकर्त्याने मोठा होत असतो, आणि समाजात वैद्यकीय सेवेएवढी समाधान देणारी दुसरी गोष्ट नसल्याची भावना आवर्जून व्यक्त केली. तर ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी हा वैद्यकीय मदत कक्ष सुरू करून गोरगरीब रुग्णांना मदत केल्याबद्दल एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले. राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी महाड येथील पुरानातर शिंदे यांनी केलेल्या मदतीसाठी त्यांचे विशेष आभार मानले, तर आम. निलेश लंके यांनी वैद्यकीय मदत कक्षाची संकल्पना आपल्या मतदारसंघात राबवण्याची विनंती एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

राज्यस्तरीय स्वरुपातील या सोहळ्यात कोरोना कालावधीत विविध क्षेत्रातून आपल्या परीने उत्कृष्ट कार्य केलेल्या राज्यातील कोरोना योद्धांचा गौरव करण्यात आला. सुरेश पाटील यांनी कोरोनाच्या सुरवातीच्या कालावधीमध्ये समस्त जैन समाजातील दानशूर व्यक्ती व संघटनाच्या वतीने अवघ्या ८ दिवसात ७५ लाख रुपयांची वैद्यकीय सुविधेसह मदत घेवुन ११ व्हेंटीलेटर व हायफ्लो नेजल बायपॅक मिळून एकुण २२ आयसीयु व ऑक्सीजनयुक्त ४० बेड्सचे 'श्री भगवान महावीर हॉस्पिटल ची उभारणी केली. यामध्ये गरीब रुग्णांना विविध सवलती, रुग्णांना मोफत भोजन सुविधा, प्रत्येक रुग्णाला ५ हजारांची मोफत औषधे वितरित करण्यात आली. २२५ हुन अधिक रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्याचबरोबर भारतीय जैन संघटनेचे शांतिलाल मुथा यांच्या सहकार्याने सांगलीमध्ये कोरोना कमांडो प्रशिक्षण, डॉक्टर आपल्या दारी, रक्त संकलन, निराश्रीतांना भोजन, मिशन कोविड कनेक्ट, सोबत मोफत मास्क, कोरोना योद्धांचा कृतज्ञता सन्मान सोहळा यासारखे विविध उपक्रम तळमळीने राबविले.

तसेच कोरोनाच्या दुस-या लाटेची तीव्रता लक्षात घेवून अवघ्या ५ दिवसात सांगलीतील लठ्ठे एजुकेशन सोसायटी यांच्या सहकार्याने श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट संचलित श्री. भगवान महावीर कौवीड हॉस्पिटल कस्तुरबाई लेडिज होस्टेल येथे स्थापन करून आपले योगदान दिले. २ महिन्यात २०५ हुन अधिक रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. १५ बेड्सचे आयसीयु व्हेटीलेटर व हायफ्लोनेजल युक्त तसेच ४० ऑक्सीजन बेड्सची व्यवस्था या हॉस्पिटलची होती. या कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला असून, समाजातील सर्व स्तरातुन सुभाष बेदमुथा, जितेंद्र नाणेशा, राजगोंडा पाटील, वसंत पाटील, अमोल चौगुले, सुभाष देसाई व श्री. भगवान महावीर कोवीड हॉस्पिटलच्या सर्व टीमचे अभिनंदन होत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.