Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कृषी कायदे रद्द करण्याच्या घोषणेपूर्वी मोदी काय म्हणाले, ऐका संपूर्ण भाषण

 कृषी कायदे रद्द करण्याच्या घोषणेपूर्वी मोदी काय म्हणाले, ऐका संपूर्ण भाषण


देशात जवळपास वर्षभरापासून शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान अनेक हिंसक घटनाही घडल्या. त्याचबरोबर कायद्यांना स्थगितीही देण्यात आली होती.

मात्र, शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यानंतर केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला.

कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायद्यांचं महत्त्व विशद केलं. सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांचा उल्लेख मोदी आपल्या भाषणात केला. भाषणाच्या अखेरीस मोदींनी कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली.

आपल्या संबोधनात मोदी म्हणाले, "पाच दशकांच्या आयुष्यात मी शेतकऱ्यांच्या अडचणी आणि आव्हानं मी खुप जवळून बघितली आहेत. २०१४ पासून जेव्हा पंतप्रधान म्हणून सेवेची संधी दिली. त्यानंतर कृषी क्षेत्राच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे", असं यांनी सांगितलं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.