Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सभासदांचा विश्वास हीच कर्मवीर पतसंस्थेच्या कार्याची प्रेरणा - जितेश कदम

 सभासदांचा विश्वास हीच कर्मवीर पतसंस्थेच्या कार्याची प्रेरणा - जितेश कदम


विजयनगर शाखा स्थलांतर सांगली कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या.. सांगली च्या विजयनगर सांगली शाखेचे स्थलांतर स्वदेशी हाईट्स, कोर्टाशेजारी विजयनगर येथील प्रशस्त कार्यालयात युवा नेते भारती सहकारी बँक लि. पुणे चे संचालक मा. जितेश कदम यांचे शुभहस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले. श्री. पाटील यांनी संस्थेच्या सांपत्तिक स्थितीची व कार्याची माहीती दिली. संस्थेचे कार्यक्षेत्र सांगली कोल्हापूर व सातारा जिल्हा असून ५१ शाखामधुन संस्थेचे कार्य सुरु आहे. संस्थेचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन कोअर बँकींग असून संस्थेच्या ठेवी ५८७ कोटी आहेत. संस्थेने रुपये ४५२ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेचे भागभांडवल २३ कोटी २५ लाख असून स्वनिधी ५७ कोटी आहे. संस्थेचे खेळते भांडवल ६७७ कोटी आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय १००० कोटीच्या पुढे आहे. संस्थेची सभासद संख्या ४३००० असून संस्थेस सतत ऑडीट वर्ग अ असून नेट एनपीए शुन्य टक्के आहे.

प्रमुख पाहुणे म्हणुन बोलताना मा. जितेश कदम यांनी अतिशय अभ्यासपूर्ण भाषण केले. त्यामध्ये त्यांनी सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनाबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. संकट काळामध्ये पतसंस्थांनी अतिशय चांगले काम केले आहे. ज्या संस्थांचे व्यवस्थापन काटेखोर आहे. कर्ज देताना काळजी घेतली जाते त्या संस्था भविष्यात टिकतील असे ते म्हणाले. कर्मवीर पतसंस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केल्यामुळेच कर्मवीर पतसंस्थेने आदर्श प्रगती केली असल्याचे त्यांनी आवर्जून नमुद केले. ज्या ठिकाणी सरकारी बँकेत जाण्याची भिती सामान्य माणसाला वाटते तेथे आपल्या भागात स्थापन झालेल्या व मोठ्या झालेल्या संस्था सभासदांना आपल्या वाटतात. त्याच पध्दतीने कर्मवीर पतसंस्थेचे एकूणच कामकाज आदर्शवत असून लवकरच ही संस्था १००० कोटीच्या ठेवीचा टप्पा पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नियोजीत कामकाजामुळे संस्था चौफेर प्रगती करत आहे त्याबद्दल त्यांनी


संचालकांचे अभिनंदन केले. यावेळी इंटेरिअर डेकोरेटर श्री. सुरेश पाटील यांचा मा. जितेश कदम यांचा सत्कार करणेत आला.

या वेळी भारती विद्यापीठाचे उपप्राचार्य माणिक हंबीरराव पाटील, सॅलरी अनर्स सोसायटीचे माजी चेअरमन श्री. इकबाल मुलाणी व श्री. दिलावर मुलाणी अॅड. प्रमोद सुतार सदाशिव महिंद डॉ. भुपाल उदगांवे, डॉ. ढोबळे, नारायण फॉडे, किसबर सय्यद सौ. विनया कुलकर्णी मॅडम सौ. आशा . वाळवेकर मॅडम चंद्रकांत गवळी उदयोजक अशोक बाबर श्री. सावंत बाळगोंडा पाटील आदी . सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमास संस्थेच्या व्हाईस चेअरमन श्रीमती भारती चोपडे, संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे. डॉ. रमेश वसंतराव ढवू लालासो भाऊसो थोटे श्री. ओ. के चौगुले श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, सौ. ललिता अशोक सकळे तज्ञ संचालक डॉ. एस. बी. पाटील (मोटके) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम उपस्थित होते. आभार संचालक अॅड. एस. पी. मगदूम यांनी मानले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.