Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

क्षयरुग्णाची आरोग्य विभागात नोंदणी आवश्यक क्षयरोगाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न नोंदणी न करणाऱ्यावर कारवाईचा महापालिकेचा इशारा

क्षयरुग्णाची आरोग्य विभागात नोंदणी आवश्यक क्षयरोगाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न नोंदणी न करणाऱ्यावर कारवाईचा महापालिकेचा इशारा


सांगली: क्षयरोगाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी शासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. जे रुग्ण आजार लपवून खाजगी रुग्णालयात उपचार घेतात त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत यासाठी आता खाजगी रूग्णालय, लॅब, मेडिकल चालकांना क्षयरोगाची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे रुग्णालय माहिती देण्यास कुचराई करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार च्या अधिसूचनेनुसार प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद करणे, त्याला उपचार देणे व क्षयरोगाचा प्रसार रोखणे, नियमित उपचारास प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी उपाययोजना म्हणून अशा रुग्णांची नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय संस्थांनी क्षयरोग निदान करणाऱ्या महापालिकेतील सर्व पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा, रिव्हर्स रेडिओलॉजी सुविधा, क्षयरुग्णावर उपचार करणारे विविध पॅथॉलॉजी, रुग्णालये, डॉक्टर्स, क्षयरोगाचे औषध विकणारे सर्व औषध विक्रेते यांना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करावी लागणार आहे. जी संस्था नोंदणी करणार नाही अशा संस्था,व्यक्तींना क्षयरोगाचा प्रसार करण्यास जबाबदार धरण्यात येणार आहे. दोषी ठरलेल्या व्यक्तीस सहा महिने ते दोन वर्षापर्यंत शिक्षा व दंडाची तरतूद आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2021 पासून सर्व रुग्णालये,  औषध विक्रेते, पॅथोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट यांनी क्षयरुग्णाची रुग्णांची नोंदणी मनपा क्षयरोग कार्यालयाकडे करण्याची नोटीस देण्यात आली असून क्षयरुग्णाची माहिती दरमहा शहर क्षयरोग अधिकाऱ्याकडे पाठविण्यात यावी तसेच नियमित रुग्ण नोंदणीसाठी व क्षयरोग निर्मूलनासाठी शासनास सहकार्य करावे असे आवाहन सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे व शहर क्षयरोग अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.