माझी वसुंधरा अभियानातंर्गत महापालिकेच्या वतीने विविध स्पर्धां : 6 शाळा व 2 महाविद्यालयातील 400 विद्यार्थ्यांचा सहभाग: मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संपन्न
सांगली: माझी वसुंधरा अभियानातंर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत 6 शाळा आणि 2 महाविद्यालयातील 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, तसेच ऑनलाईन पीपीटी प्रेझेन्टेशन आणि निबंध स्पर्धांचा समावेश आहे.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात माझी वसुंधरा अभियानाची जागृती करण्यासाठी आणि या अभियानात लोकसहभाग यावा आणि विद्यार्थ्यांमध्ये वसुंधरा रक्षण आणि संवर्धन याबाबत जागृती व्हावी या उद्देशाने महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी विविध स्पर्धा घेणेबाबत सूचना दिल्या होत्या. यानुसार महापालिका क्षेत्रात चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, तसेच ऑनलाईन पीपीटी प्रेझेन्टेशन आणि निबंध स्पर्धां घेतल्या जात आहेत. आतापर्यंत महापालिका प्रशासनाकडून 6 शाळा आणि 2 महाविद्यालयात
स्पर्धा घेण्यात आल्या असून यामध्ये 400 हुन अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. यासाठी महापालिकेकडून प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात समनव्यक नेमण्यात आले असून समन्वयकांच्या उपस्थितीत या स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके आणि आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे यांच्या सह महापालिकेचे समन्वयक आणि स्वच्छ सर्व्हेक्षण विभागाची टीम कार्यरत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.