महापालिकेकडून गुंठेवारी प्रमानपत्र विशेष शिबिरात पहिल्याच दिवशी 526 प्रस्ताव दाखल : सात दिवसात गुंठेवारी प्रमाणपत्र नागरिकांना सुपूर्त करणार ... मनपाआयुक्त नितीन कापडणीस यांची माहिती
दीनानाथ नाट्यगृहात
महापालिका क्षेत्रातील नागरीकासाठी बुधवार दि. 24 नोव्हेंबर व 25 नोव्हेंबर रोजी गुंठेवारी क्षेत्रातील जुने अथवा नवे प्रस्ताव दाखल करून घेण्यासाठी गुंठेवारी प्रमानपत्र विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विरोधीपक्षनेते संजय मेंढे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, संजय बजाज, उपायुक्त राहुल रोकडे, चंद्रकांत आडके, नगरसेवक उत्तम साखळकर, विष्णू माने, अभिजित भोसले, फिरोज पठाण, शेडजी मोहिते, हरिदास पाटील, नगरसेविका आरती वळवडे, शुभांगी साळुंखे, आदींसह नगररचना विभागाचे सहायक संचालक विनय झगडे, शिबिर समन्वयक चेतन हडदरे, पंकजा कोरे, संजय कांबळे, आरव्ही काकडे, श्याम गेजगे, रवी भिंगारदिवे, अल्ताफ मकानदार, अभिजित मोरे, प्रसन्न भोसले, यासीन मंगळवारे, अण्णासाहेब मगदूम, महादेव पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या उपस्थित होते. या शिबिरात पहिल्याच दिवशी 526 नागरिकांनी आपले प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. दाखल प्रस्तावाची पुढील सात दिवसात प्राप्त कागदपत्रांची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांची प्रमाणपत्र तयार केली जाणार आहेत. तसेच लवकरच एखादा कार्यक्रम घेऊन ही प्रमाणपत्रे नागरिकांना सुपूर्त केली जाणार आहेत. तरी गुंठेवारी क्षेत्रातील नागरिकांनी दोन दिवसीय शिबिरात जास्तीत जास्त प्रस्ताव दाखल करावेत असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
गुंठेवारी प्रमाणपत्रासाठी दाखल प्रस्ताव
सांगली 183
मिरज 40
कुपवाड 303
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.