अख्खं तिरूपती शहर पाण्याखाली; 50 वर्षात पहिल्यांदाच भयावह पूर परिस्थिती
तिरुपती, 19 नोव्हेंबर : देशातील सर्वाधिक श्रीमंत तिर्थक्षेत्र अशी ओळख असलेल्या तिरुमला तिरुपतीमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे.
यामुळे तेथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तिरुमालाच्या रस्त्यांसह तिरुपतीतील अनेक भाग जलमय झाले आहेत. तर मुख्य मंदिराच्या बाहेरील भागासह आणि दर्शन रांगेचा परिसर पाण्याखाली गेला आहे. अनेक ठिकाणी भाविक अडकले आहेत.
मंदीराच्या सभोवताली असलेल्या डोंगरामधून येणारा पाण्याचा प्रवाह अभूतपूर्व असून गेल्या पन्नास वर्षांत पहिल्यांदाच अशी परिस्थिती उदभवली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र हवेच्या बुडबुड्यात बदलल्याने चित्तूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे.तिरुपतीहून तिरुमला मंदीराकडे जाणा-या घाट रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती. तर काही ठिकाणी पूर्ण मार्ग पाण्याखाली गेला आहे.
तिरुमलाच्या येथील अतिवृष्टीमुळे मंदिराच्या मुख्य कार्यालयातही पावसाचे पाणी पोहोचले. नारायणगिरी गेस्ट हाऊसमधील तीन खोल्या भूस्खलनामुळे उद्ध्वस्त झाल्या आहेत. हे ही सॅल्यूट! पॉईंट्समनने मरणाच्या दारातून प्रवाशाला बाहेर काढलं; थरारक व्हायरल तिरुमला घाटातील दोन घाट रस्ते भूस्खलनामुळे अधिकाऱ्यांनी बंद केले.
18 तारखेपर्यंत पदपथ खुला होणार नाही. तिरुमला येथील मोबाईल नेटवर्क सेवाही विस्कळीत झाली.पुराचे पाणी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कार्यालयातही पोहोचले. एपी टुरिझम रेस्टॉरंटची भिंत कोसळली.तिरुपतीमध्ये आज पुराच्या धोक्याची कमाल पातळी जाहीर करण्यात आली आहे. तिरुपती शहरात पुराच्या पाण्यात काही अंतरावर वाहनेही वाहून गेली. शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी पुराचे पाणी साचले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.