Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

या' सरकारी बँकेत सर्वात कमी व्याजदर ! तात्काळ पैशांची गरज असेल तर तुम्ही देखील घेऊ शकता 'कर्ज'; जाणून घ्या 5 लाख रुपयांवर किती द्यावा लागेल EMI

या' सरकारी बँकेत सर्वात कमी व्याजदर ! तात्काळ पैशांची गरज असेल तर तुम्ही देखील घेऊ शकता 'कर्ज'; जाणून घ्या 5 लाख रुपयांवर किती द्यावा लागेल EMI


नवी दिल्ली :  जर तुम्हाला ताबडतोब पैशांची गरज असेल आणि कोणत्याही सोर्सकडून पैसे मिळण्याची आशा नसेल तर तुम्ही अशावेळी एखाद्या खासगी बँकेचे पर्सनल लोन घेऊ शकता.

यासाठी इतर कर्जाप्रमाणे पर्सनल लोन काही गहाण ठेवावे लागत नाही आणि गॅरंटीची आवश्यकता नसते.

केवळ तीन महिन्याची सॅलरी स्लीप आणि फॉर्म 16 द्यावा लागेल. तसेच स्वयंरोजगार करत असाल तर मागील 1 वर्षाचा आयटीआर आणि बिझनेस ऑडिट द्यावे लागेल. डॉक्टर किंवा सीएचे काम करत असाल तर लायसन्स सुद्धा दाखवावे लागेल.

यानंतर तुम्हाला गरजेप्रमाणे पर्सनल लोन मिळेल. पर्सनल लोन  इतर कर्जांच्या तुलनेत थोडे महाग असते. कारण यामध्ये काही गहाण ठेवावे लागत नाही, किंवा गॅरंटी द्यावी लागत नाही. मात्र सर्वात स्वस्त पर्सनल लोन देणारी सरकारी बँक सुद्धा आहे. या बँकांबाबत जाणून घेवूयात.

1. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आहे सर्वात कमी व्याज -

सरकारी बँक, युनियन बँक ऑफ इंडिया सध्या पर्सनल लोनवर सर्वात कमी इंटरेस्ट घेत आहे. येथे 8.90 टक्के दराने सहज पर्सनल लोन मिळते. या बँकेकडून 5 लाख रुपयांचे पर्सनल लोन घेतल्यास 10,355 रुपये ईएमआय द्यावा लागेल.

2. सेंट्रल बँकेत आहे हा व्याजदर -

सेंट्रल बँक ऑफ इंडिया 8.90 टक्के दराने कर्ज देत आहे. येथे 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर 10,355 रुपये ईएमआय द्यावा लागेल.

3. पंजाब नॅशनल बँक -

पंजाब नॅशनल बँक 8.95 टक्के व्याजदराने पर्सनल लोन देत आहे. येथे 5 लाखांवर 5 वर्षासाठी 10,367 रुपये ईएमआय द्यावा लागेल.

प्रायव्हेट बँकांचा व्याजदर आणि 5 लाखावर EMI -

* HDFC Bank 10.25 टक्के - ईएमआय 10,685 रुपये

* Federal Bank 10.49 टक्के - ईएमआय 10,744 रुपये

* ICICI Bank 10.50 टक्के - ईएमआय 10,747 रुपये

* Kotak Bank 10.75 टक्के - ईएमआय 10,809 रुपये


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.