Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिका क्षेत्रात क्षयरोग रुग्ण शोध मोहिमेत 5 हजार नागरिकांचा सर्व्हे पूर्ण : 4 क्षयरुग्ण सापडले : 25 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार शोध मोहीम

महापालिका क्षेत्रात क्षयरोग रुग्ण शोध मोहिमेत 5 हजार नागरिकांचा सर्व्हे पूर्ण : 4 क्षयरुग्ण सापडले : 25 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार शोध मोहीम


सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्यावतीने सुरू असणाऱ्या क्षयरोग रुग्ण शोध मोहिमेत आतापर्यंत 5 हजार नागरिकांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. या सर्व्हेत आतापर्यंत 4 क्षयरुग्ण सापडले आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाक्षेत्रात ही क्षयरोग रुग्णशोध मोहीम गतिमान झाली असून 25 नोव्हेंबर पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.

     शासनाच्या आदेशानुसार मनपाक्षेत्रात 15 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीत क्षयरोग रुग्ण शोध मोहीम राबविली जात आहे. यासाठी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके तसेच आरोग्यधिकारी तथा शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ रवींद्र ताटे यांच्या सूचनेनुसार मनपाक्षेत्रात क्षयरोग रुग्ण शोध मोहीम राबविली जात आहे. यासाठी 40 टीम कार्यरत असून एकूण 80 हजार नागरिकांचा यामध्ये सर्व्हे केला जाणार आहे. यामध्ये 15 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर 2021 या चार दिवसात पाच हजार नागरिकांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. उर्वरित सर्व्हे हा सुरूच असून 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत हा सर्व्ह पूर्ण केला जाणार आहे. आतापर्यंत मनपाक्षेत्रात सुरू असणाऱ्या सर्व्हेमध्ये 4 क्षयरुग्ण आढळले असून त्यांच्यावर पुढील योग्य ते उपचार सुरू करण्यात आले आहेत. 

नागरिकांनी महापालिकेच्या 

पथकाला माहिती द्यावी: आयुक्त कापडणीस

महापालिका क्षेत्रात क्षयरोग  

रुग्ण शोध मोहीम सुरू आहे. यासाठी महापालिकेची वैद्यकीय टीम आपआपल्या घरी सर्व्हेसाठी येत आहे. ज्यांना 2 आठवड्यापेक्षा अधिकचा खोकला आहे, भूक लागत नाही, वजन कमी झाले आहे अशी लक्षणे असतील तर त्यांनी वैद्यकीय टीमला त्याची माहिती द्यावी. वेळेत माहिती दिल्यास त्या क्षयरुग्णांवर उपचार करता येतील असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.