Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गुजरातमध्ये तब्बल 350 कोटींचे ड्रग्ज जप्त.

 गुजरातमध्ये तब्बल 350 कोटींचे ड्रग्ज जप्त.


गुजरातमध्ये पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा सापडला आहे. देवभूमी द्वारका येथे 350 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या हेरॉईन आणि मेफेड्रोनचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. गुजरातमधील या ड्रग्ज रॅकेटचे पाकिस्तान कनेक्शन उघड झाले असून, तिघांना अटक केली आहे.

यात एक आरोपी ठाण्यातील मुंब्रा येथील भाजी विक्रेता आहे.

राजकोट रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप सिंह यांनी कारवाईबाबत माहिती दिली. आराधना धाम येथे ड्रग्जचा साठा असल्याची खबर देवभूमी द्वारका पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बसस्थानकावरून शेहजाद घोषी या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेतून 11 किलो हेरॉईन आणि 6 किलो मेफेड्रोन जप्त केले. याची पिंमत 88 कोटी 25 लाख आहे.

250 कोटी किमतीचे ड्रग्ज 47 पाकिटांमधून आणले

शेहजाद घोषी हा ठाण्यातील मुंब्रा येथील असून, तो भाजी विव्रेता आहे. तो तीन दिवसांपूर्वीच खंभालिया येथे आला होता आणि आरती गेस्ट हाऊस येथे थांबला होता. शेहजादच्या चौकशीनंतर सलीम कारा आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 47 पाकिटे ड्रग्ज जप्त केले आहे. त्याची पिंमत 250 कोटींवर आहे. पाकिस्तानातून हे ड्रग्ज आल्याची माहिती मिळाली आहे. समुद्रमार्गे पाकिस्तानातून गुजरातमध्ये अमली पदार्थांची मोठय़ा प्रमाणावर तस्करी होत आहे.

मुंद्रा बंदरात 21 हजार कोटींचे ड्रग्ज सापडले होते\

गेल्या काही महिन्यांपासून गुजरातमध्ये हजारो कोटींचे ड्रग्ज' सापडत आहे. सप्टेंबरमध्ये कच्छ येथील मुंद्रा बंदरातून दोन पंटेनर्समध्ये भरलेले तब्बल 3 हजार किलो ड्रग्ज जप्त केले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 21 हजार कोटी रुपये आहे. आजवर देशात सापडलेला हा सर्वात मोठा ड्रग्ज साठा आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.