Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्ह्यात शिवभोजन केंद्रातून आत्तापर्यंत 22 लाख 63 हजारांहून अधिक थाळ्यांचे वाटप

 जिल्ह्यात शिवभोजन केंद्रातून आत्तापर्यंत 22 लाख 63 हजारांहून अधिक थाळ्यांचे वाटप


सांगली, दि. 9,  : राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागाने शिवभोजन योजना सुरू केली. त्यानुसार सांगली जिल्ह्यात 26 जानेवारी 2020 रोजी शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. आजमितीस सांगली जिल्ह्यात सांगली, मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात 20 व तालुका स्तरावर 18 अशी एकूण 38 शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. जिल्ह्याचा शिवभोजन योजनेचा नियमित इष्टांक 4825 इतका असून जिल्ह्यातील सर्व शिवभोजन केंद्रातून दि. 26 जानेवारी 2020 ते दि. 08 नोव्हेंबर, 2021 अखेर एकूण 22,63,429  थाळ्याचे वाटप झालेले आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दि. 1 एप्रिल, 2020 पासून दि. 13 एप्रिल, 2021 पर्यंत शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना 5 रु. प्रतिथाळी प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आली. या काळात 10 लाख 46 हजार 392 इतक्या लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. दि. 15 एप्रिल, 2021 पासून दि. 30 सप्टेंबर, 2021 पर्यंत दीडपट इष्टांक तसेच मोफत प्रमाणे शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या काळात 9 लाख 48 हजार 268 इतक्या लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. दि. 01 ऑक्टोंबर, 2021 पासून शिवभोजन थाळी मूळ इष्टांकासह 10 रु. प्रतिथाळी प्रमाणे लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.  


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.