22 रुपयांच्या 'या' शेयरमध्ये केवळ 25 हजार लावून लोक बनले करोडपती, मिळाला 4.5 कोटींचा रिटर्न
नवी दिल्ली : जर तुम्हाला शेयर बाजारात गुंतवणुक करायची असेल तर तुम्ही पेनी स्टॉक मध्ये करू शकता. सध्या पेनी स्टॉक्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे.
पेनी स्टॉक असे स्टॉक आहेत. जे खुप स्वस्त असतात आणि ज्यांचे बाजार मूल्य कमी असते.
या कंपनीचा आहे स्टॉक
आज आम्ही तुम्हाला एका अशा स्टॉकबाबत सांगणार आहोत, ज्यामध्ये पैसे लावून खुप कमी वेळात गुंतवणुकदार करोडपती बनले. फार्मा, बल्क ड्रग आणि फ्रेगरन्स सारख्या क्षेत्रात व्यवसाय करणारी भारत रसायन कंपनीचा स्टॉकसुद्धा यापैकीच एक आहे.
20 वर्षात 40,000 टक्के रिटर्न
भारत रसायनच्या स्टॉकने आपल्या शेयरधारकांना 20 वर्षात 40,000 टक्केपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे.
या केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शेयरमध्ये 20 वर्षापूर्वी 25,000 रुपयांची केलेली गुंतवणूक आज करोडो रुपये झाली आहे.गुंतवणुकदार झाले मालामाल!
भारत रसायन च्या हिस्ट्रीवर नजर टाकली तर 12 नोव्हेंबर 2001 ला हा शेयर NSE वर 22 रुपयांच्या स्तरावर बंद झाला होता.
तर, 15 नोव्हेंबर 2021 ला भारत रसायनचा शेयर 10,100 रुपयांच्या स्तरावर बंद झाला आहे.
तर मिळाला असता 1.14 कोटी रुपयांचा रिटर्न
अशावेळी जर एखाद्या गुंतवणुकदाराने 12 नोव्हेंबर 2001 ला भारत रसायन मध्ये 25,000 रुपयांची गुंतवणुक केली असती तर आज त्यांना 1.14 कोटी रुपयांचा रिटर्न मिळाला असता.
1 लाख झाले असते 4.5 कोटी
जर, एखाद्या गुंतवणुकदाराने 12 नोव्हेंबर 2001 ला या केमिकल स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज हे पैसे 4.5 कोटी रुपये झाले असते.
पण जर गुंतवणुकदारांनी आपली रक्कम कायम ठेवली असती तरच इतका फंड झाला असता.
दुसर्या तिमाहीचा परिणाम
लॉकडाऊनमुळे कंपनीचा एकात्मिक लाभ जरी थोडा कमी झाला असला तरी त्याची कामगिरी चांगली होती.
चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमहीत कंपनीचे कन्सोलेडेटेट प्रॉफिट 35.4 टक्के घसररून 35.27 कोटी रुपये राहिले, यातून मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीमध्ये तो 54 कोटी रुपये होता.
मागील एका वर्षात कंपनीच्या शेयरची कामगिरी खुप उत्साहजनक होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.